आनंद चंदनशिवे यांचे मंत्री दत्ता भरणे व माजी मंत्री संजय बनसोडे यांच्या समवेत अभिवादन
पुणे : भीमा कोरेगाव ऐतिहासिक लढाईत लढलेल्या व शहीद झालेल्या वीरांना भावपूर्ण आदरांजली वाहिली. कोरेगाव भीमा येथे ऐतिहासिक विजय स्तंभास क्रिडा व अल्पसंख्यांक मंत्री दत्ता मामा भरणे, माजी क्रीडा राज्यमंत्री संजय बनसोडे, पुणे जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष तथा मा.गटनेते आनंद चंदनशिवे यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले.


विजयस्तंभ परिसर विकास , परिसरात सर्व सोयी सुविधा व उत्तम नियोजन केल्या बद्दल मान्यवरांचे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा, निळी टोपी शाल व पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
यावेळी क्रीडा व अल्पसंख्यांक मंत्री दत्ता मामा भरणे यांनी महाराष्ट्र शूरांची भूमी असून राज्याला शौर्य, त्याग, पराक्रम, बलिदानाची गौरवशाली परंपरा आहे. स्वत्व, स्वाभिमानासाठी आत्मबलिदान करणाऱ्या वीरांचा हा महाराष्ट्र आहे. असे सांगुन शौर्य दिनाच्या व नववर्षाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रम प्रसंगी माजी नगरसेवक गणेश पुजारी, अंगराज भालशंकर अविनाश भडकुंभे, चंद्रकांत सोनावणे, अजय इंगळे युवा मस्के उपस्थित होते.