Saturday, February 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

अक्षय अंजिखाने मित्रपरिवाराच्या दिनदर्शिकेचे थाटात प्रकाशन ; या नेत्यांची उपस्थिती

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
8 December 2025
in political
0
अक्षय अंजिखाने मित्रपरिवाराच्या  दिनदर्शिकेचे थाटात प्रकाशन ; या नेत्यांची उपस्थिती
0
SHARES
29
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


अक्षय अंजिखाने मित्रपरिवाराच्या
दिनदर्शिकेचे थाटात प्रकाशन ; या नेत्यांची उपस्थिती

सोलापूर : जगतज्योती महात्मा बसवेश्वर पुतळा परिसराच्या सुशोभीकरणाकरिता २० लाख रुपयांचा निधी मंजूर केल्याबद्दल अक्षय अंजिखाने मित्रपरिवार आणि बसवेश्वर सर्कल मित्र परिवारातर्फे आमदार देवेंद्र कोठे यांचा सत्कार करण्यात आला. जगतज्योती महात्मा बसवेश्वर पुतळा परिसरात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी अक्षय अंजिखाने यांनी प्रकाशित केलेल्या दिनदर्शिकेचेही प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी व्यासपीठावर डॉ. शिवरत्न शेटे भारतीय जनता पार्टीच्या अध्यक्षा रोहिणी तडवळकर माजी सभागृह नेते सुरेश पाटील माजी नगरसेवक जगदीश पाटील अखिल भारतीय पद्मशाली पुरोहित संघाचे पंडित वेणुगोपाल जिल्ला पंतलू, श्री सिद्धेश्वर देवस्थानचे विश्वस्त प्रभुराज मैंदर्गीकर, माजी नगरसेवक प्रथमेश कोठे, चन्नवीर चिट्टे, माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर, केदार उंबरजे, बसवेश्वर मध्यवर्ती महामंडळाचे गणेश चिंचोळी, आनंद मुस्तारे, संजय साळुंखे, श्री सिद्धरामेश्वर यात्रेचे मानकरी मनोज हिरेहब्बू, माजी नगरसेवक राजकुमार हंचाटे, अनिल पल्ली, कार्यक्रमाचे संयोजक आणि भाजपाचे मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने उपस्थित होते.

याप्रसंगी शिवचरित्र व्याख्याते डॉ. शिवरत्न शेटे म्हणाले, सोलापूर शहराला महाराष्ट्रातील इतर शहरांच्या तुलनेने मोठा सांस्कृतिक वारसा लाभला आहे. श्री सिद्धरामेश्वर आणि महात्मा श्री बसवेश्वरांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही भूमी आहे. श्री सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या ६८ लिंगांच्या विकासासाठी २ कोटी रुपयांचा विकास निधी आमदार देवेंद्र कोठे यांनी आणला आहे. भाजपाचे मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने यांनी प्रयत्न करून जगतज्योती श्री महात्मा बसवेश्वर महाराजांच्या पुतळा सुशोभीकरणासाठी २० लाख रुपयांचा निधी खेचून आणला आहे, ही कौतुकास्पद बाब आहे, असेही डॉ. शिवरत्न शेटे यांनी सांगितले.

आमदार देवेंद्र कोठे म्हणाले, महात्मा बसवेश्वर पुतळा परिसर सुशोभीकरणासाठी भाजपाचे मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने आणि बसवेश्वर सर्कल मित्र परिवाराने कौतुकास्पद पाठपुरावा केला. या कामाबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे आग्रही आहेत. येथे होणाऱ्या सुशोभीकरणाच्या कामासाठी आणखी जितका निधी लागेल तो निधी देण्याचे त्यांनी मान्य केलेले आहे, असेही आमदार देवेंद्र कोठे यांनी याप्रसंगी सांगितले.

कार्यक्रमाचे संयोजक आणि भाजपाचे मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने म्हणाले, बसवेश्वर सर्कल मित्र परिवारातर्फे महात्मा श्री बसवेश्वर महाराजांची नित्य पूजा करण्यात येत होती. परंतु पुतळा परिसराचे सुशोभीकरण करण्याची आवश्यकता होती. ही मागणी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्याकडे केल्यानंतर त्यांनी तत्काळ २० लाख रुपयांचा निधी महात्मा बसवेश्वर पुतळा परिसर विकासासाठी मंजूर केला. लवकरच हे काम पूर्णत्व जाईल, असेही अक्षय अंजिखाने यांनी याप्रसंगी सांगितले.

याप्रसंगी सागर आतनुरे, राजकुमार हंचाटे, वेणूगोपाळ जिल्ला पंतलू, केदार उंबरजे, गुरुराज पद्मगोंडा, गणेश चिंचोळी, आनंद मुस्तारे, विजय कुलथे, संजय साळुंखे, भीमाशंकर पडमगोंड, आशिष दुलंगे, तुषार पवार, महेश जेऊर, सतीश पारेली, अमर गट्टी, अभिराज शिंदे, किरण मडूर, अमित चडचणकर, बाबुराव क्षीरसागर, यतिराज होनमाने, सुरज पाटील, कल्पक पुदाले, रोहित परीटसह लिंगायत समाजातील सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
————

अक्षय अंजिखाने आणि बसवेश्वर सर्कल मित्र परिवाराचे मान्यवरांकडून कौतुक

जगतज्योती महात्मा श्री बसवेश्वर महाराजांच्या पुतळा परिसर सुशोभीकरणासाठी भाजपाचे मंडल अध्यक्ष अक्षय अंजिखाने आणि बसवेश्वर सर्कल मित्र परिवाराने केलेल्या कौतुकास्पद पाठपुराव्यामुळे या कामास गती मिळाली आहे. याबद्दल उपस्थितांकडून अक्षय अंजिखाने आणि बसवेश्वर सर्कल मित्र परिवाराचे कौतुक करण्यात आले.
————

कैलासवासी ओंकार पद्मगोंडा यांची स्वप्नपूर्ती

कैलासवासी ओंकार हा तरुण अगदी लहानपणापासून महात्मा श्री बसवेश्वर महाराजांच्या पुतळा परिसराची नित्यनियमाने स्वच्छता व सेवा करत होता. सोलापूर शहर स्मार्ट होत असताना महात्मा श्री बसवेश्वर महाराजांचा परिसर देखील स्मार्ट झाला पाहिजे याकरिता त्याने त्याची व्यथा अक्षय अंजिखाने व सागर अतनूरे यांना बोलून दाखवली होती. तेव्हापासून या कामाचा सुरू असलेला पाठपुरावा तत्कालीन पालकमंत्री विखे पाटील यांनी २५ लाख रुपयांचा निधी व पालकमंत्री जयकुमार गोरे व आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून २० लाखांचा निधी मंजूर करून दिले. त्यामुळे ओंकारचे स्वप्न पूर्णत्वास होत आहे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Tags: #Akshay anjikjaneDevendra kothe
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरच्या देशमुखांची ही कसली एकी; फक्त स्वतःच्या अस्तित्वासाठीची युती, कार्यकर्त्यांची मात्र माती

Next Post

सोलापूरच्या दादा अन् भाऊंची नागपूरमध्ये मार्केटिंग

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापूरच्या दादा अन् भाऊंची नागपूरमध्ये मार्केटिंग

सोलापूरच्या दादा अन् भाऊंची नागपूरमध्ये मार्केटिंग

ताज्या बातम्या

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026
अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

अक्कलकोट मध्ये भाजपला धक्का ! आनंद तानवडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत

22 January 2026
ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती  ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

ZP Election ! भाजपची सोलापुरात दोन जागी युती ; इकडे मामा आणि तिकडे बापुसोबत जाणार जयाभाऊ

20 January 2026
दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

दादांच्या राष्ट्रवादीला धक्का ! या सेलच्या जिल्हाध्यक्षाने दिला राजीनामा

19 January 2026
दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

दादा अन् ‘अण्णां’नी लावला सोलापूरच्या कार्यकर्त्यांना ‘चुन्ना’

19 January 2026
“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

“छोटा बच्चा जान के कोई ना समजाना रे” ! दादा अनेकाना पुरून उरला !

16 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

February 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
232425262728  
« Jan    

Our Visitor

1970464
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group