Wednesday, September 2, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

मुख्यमंत्री साहेब रोजगार द्या ! शहीददिनी महापुरुषांना अभिवादन करत युवा महासंघाची अनोखी रॅली!

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
23 March 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर –  महाराष्ट्र राज्यात लाखोंच्या संख्येने बेरोजगार आहेत. दिवसेंदिवस सुशिक्षित तरुणांची बेरोजगारी वाढत आहे. आज शेतकरी,आदिवासी,राज्य सरकारी कर्मचारी आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावरची लढाई केल्याशिवाय सरकार पुढे पाऊल टाकत नाही. नोकर भरती बंदीमुळे कित्येक शासकीय पदे वर्षानुवर्षे रिक्त आहेत. रोजगार हमी योजनेची काटेकोर अंमलबजावणी होत नाही. याला सर्वस्वी राज्य सरकार जबाबदार आहे. बेरोजगार तरुणांच्या वास्तवाशी खेळ करत असेल तर आगामी काळात बेरोजगार तरुणांचे राज्यव्यापी आंदोलन छेडणार असा आक्रमक पवित्रा संघटनेचे जिल्हा सचिव अँड.अनिल वासम यांनी घेतला. 

गुरुवारी 23 मार्च शहीद भगतसिंग,सुखदेव,राजगुरू यांच्या हौतात्म्य दिनी डेमोक्रॅटिक युथ फेडरेशन ऑफ इंडिया जिल्हा समितीच्या वतीने देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्राणांची आहुती दिलेल्या महापुरुषांच्या स्वप्नातील भारत घडण्यासाठी युवकांच्या हाती रोजगार देण्याची गरज आहे. ही मागणी घेऊन जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या नेतृत्वाखाली महापुरुषांना अभिवादन रॅली काढण्यात आली. 

या  अभिवादन रॅलीची सुरुवात दत्त नगर लाल बावटा कार्यालय येथे शहीद भगतसिंग, सुखदेव,राजगुरू  यांच्या प्रतिमेला राज्य सचिव साथी दत्ता चव्हाण व जिल्हा अध्यक्ष विक्रम कलबुर्गी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सकाळी 11 वाजता सर्वांना शिक्षण सर्वांना रोजगार मिळाले पाहिजे, मुख्यमंत्री साहेब रोजगार द्या, नको भाषणे नको आश्वासने  नोकरी द्या, माझी नोकरी कोठे आहे? खाजगीकरण,कंत्राटीकरण रद्द करा.रिक्त पदे तातडीने भरा, नोकरभरती बंदी उठवा शिक्षण व रोजगार आमच्या हक्काचं  अशा मागण्यांचे फलक घेऊन गगनभेदी आवाजात घोषणा देत रॅलीची सुरुवात राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळा-लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, डॉ.द्वारकानाथ कोटणीस पुतळा-महात्मा ज्योतिबा फुले पुतळा-छत्रपती संभाजी महाराज पुतळा-छत्रपती शिवाजी महाराज पुतळा-पुण्यश्लोक अहिल्यादेवी व चार हुतात्मा पुतळा मार्गे डॉ.बाबासाहेब आंबेडकर आदी महापुरुषांना पुष्पहार अर्पण करून  येथे दुपारी १२ वाजता रॅलीचा समारोप करण्यात आला. राज्य सचिव दत्ता चव्हाण यांनी अभिवादन रॅलीस समारोपपर मनोगत व्यक्त केले. 

यावेळी सिटू चे राज्य महासचिव एम.एच.शेख, ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ.नरसय्या आडम मास्तर व संघटनेचे राज्य सचिव साथी दत्ता चव्हाण आदींनी मार्गदर्शन केले. 

यावेळी  जिल्हा कोष्याध्यक्ष बालकृष्ण मल्याळ,अशोक बल्ला, विजय हरसुरे, सनी कोंडा, मधुकर चिल्लाळ, आप्पाशा चांगले, बालाजी गुंडे आदींची  प्रमुख उपस्थिती होती. 

नरेश गुल्लापल्ली ,श्रीकांत कांबळे,अमित मंचले, दीपक निकंबे, योगेश आकीम, पुष्पा गुरुपनवरू, दिनेश बडगू,राकेश म्हेत्रे, सद्दाम बागवान, भानुचंद्र म्याकल,राहुल बुगले, सनी आमाटी मल्लेशम कारमपूरी,राहुल जाधव, मीरा कांबळे,

अजय भंडारी,आदिनाथ चव्हाण, आनंद कसबे,राजू मरेड्डी,सीमन पोगुल,किशोर गुंडला, अंबाजी दोंतुल आदींनी परिश्रम घेतले.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रतिकात्मक पुतळा जाळला ; युवक काँग्रेस का झाली इतकी आक्रमक

Next Post

सोलापूरचा एकच विषय इतका महत्वाचा की ; आमदार प्रणिती शिंदेंसह माजी मंत्री जयंत पाटलांनी अधिवेशनात मांडला प्रश्न

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूरचा एकच विषय इतका महत्वाचा की ; आमदार प्रणिती शिंदेंसह माजी मंत्री जयंत पाटलांनी अधिवेशनात मांडला प्रश्न

ताज्या बातम्या

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

1998302
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group