राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेमध्ये गोरगरीब जनतेला आनंदाचा शिधा म्हणजेच धान्याचे किट देण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाप्रमाणे गुढीपाडवा या सणानिमित्त सर्व जनतेने पर्यंत आनंदाचा शिधा देण्याचे आश्वासन केले होते.
गुडी पाडवा येऊन गेला तरी गोरगरीब जनतेला आनंदाचा शिधा मिळाला नाही. शासनाने घोषणा केल्याप्रमाणे जनतेमध्ये आनंदाचा शिधा मिळाला नाही. तरी मुख्यमंत्री शिंदे यांनी घोषणा केल्याप्रमाणे गोरगरीब जनतेला लवकरात लवकर आनंदाचा शिधा मिळावे यासंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या युवती संघटनेकडून युवती शहराध्यक्ष डॉक्टर प्रतीक्षा चव्हाण यांनी निवासी जिल्हाधिकारी शमा पवार यांच्याकडे निवेदन दिले.
यावेळेस सुप्रिया लोमटे, प्रेरणा मैंदर्गीकर, काजल निंबाळकर, मनीषा गायकवाड आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


















