राज्याच्या महसूल विभागाने 45 अव्वल कारकून आणि 17 मंडल अधिकाऱ्यांना नायब तहसीलदार पदी पदोन्नती दिली. त्यामध्ये सोलापूर महसुल भागातील 15 जणांना नायब तहसीलदार पदी बढती मिळाली आहे.
यामध्ये मंडळ अधिकारी चंद्रकांत हेडगिरे, स्मिता गायकवाड, जयश्री पंचे, संजय भडारे यांच्यासह इतर 15 जणांचा समावेश आहे या पदोन्नती बद्दल प्रांत १ मधील नायब तहसीलदार रियाज कुरणे, महसुल संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष शतनु गायकवाड, रत्नाकर कांबळे, श्रीमती नाकेदार, वंदना गोवे, स्वामी यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.




















