सोलापूर : गेल्या काही दिवसापूर्वी राज्य सरकारी कर्मचारी संपावर गेल्यामुळे अनेक महिला अंगणवाडी अर्ज करू शकले नाहीत कारण की सदरील दाखल्यामध्ये नियम व अटी प्रमाणे उत्पन्न दाखले, रहिवासी दाखले, जातीचे दाखले हे सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मिळण्यास विलंब झाला.
म्हणून सदरील भरती प्रक्रियेला मुदतवाढ मिळावी या मागणीसाठी रॉयल बहुउद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे निवेदन देण्यात आले. आमच्या मागणीकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे अन्यथा मागणी मान्य न झाल्यास. आंदोलनं करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळेस रॉयल संस्थाचे संस्थापक अध्यक्ष सादिक भाई नदाफ व युवा अध्यक्ष सलमान नदाफ, उपाध्यक्ष रेहान मुल्ला, कादर भागनगरी,सिकंदर शेख, सचिन जाधव उपस्थित होते.


















