सोलापूर : तुळजापूर रोडवरील चव्हाण फर्निचरसमोरील पर्ल ग्रुपचा श्री राजशेखर बिराजदार नगर ओपन प्लॉट प्रकल्पाच्या प्लॉट विक्रीचा शुभारंभ थाटात पार पडला. प्रारंभी विमल राजशेखर विराजदार यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी क्रेडाई महाराष्ट्राचे अध्यक्ष सुनील फुरडे, सोलापूरचे अध्यक्ष शशिकांत जिड्डीमनी, पर्ल ग्रुपचे महेश थोवडे, सचिन शहा उपस्थित होते.
सोलापुरातील सर्वाधिक सुविधा देणारा प्रकल्प सादर करताना आनंद होत असल्याचे संकेत थोबडे यांनी सांगितले. हा प्रकल्प कै. राजशेखर विराजदार यांना समर्पित करीत असल्याचे मोहन सचदेव यांनी सांगितले. आर्किटेक्ट केदार बिराजदार यांनी पुणे, मुंबईच्या धर्तीवर येथे सुविधा देण्यात आल्याचे सांगितले. १० एकरच्या संपूर्ण ओपन प्लॉट प्रकल्पास कंपाउंड केले असून प्रत्येक प्लॉटला स्वतंत्र ड्रेनेजलाइन, नळ कनेक्शन, प्रत्येक प्लॉटमध्ये एक फळझाड अशा सुविधा देण्यात आल्या आहेत.
तसेच प्रकल्पातील अंतर्गत रस्ते हे सिमेंटचे आहेत. स्ट्रीट लाईट, मंदिर परिसर, कार्यक्रमासाठी लॉन, मुलांना खेळण्यासाठी स्वतंत्र विभाग, ओपन जीम अशा अनेक नावीन्यपूर्ण सुविधा देण्यात आल्या आहेत, अशी माहिती अविनाश विडवे यांनी दिली. शुभारंभ व गुढीपाडव्यानिमित्त ११ ग्राहकांनी स्पॉट बुकिंग केले. या प्रकल्पास सोलापूरकरांनी अवश्य भेट द्यावी, असे आवाहन अॅबिलिटी कन्स्ट्रक्शनचे अमर बिराजदार यांनी केले.



















