सोलापूर : संत वीरशैव कक्कय्या समाजसुधारक मंडळ भवानी पेठ सोलापूरचे जेष्ठ कार्यकर्ते व एस.एम.एस. न्यूज चैनलचे संपादक सोमनाथ मल्लिकार्जुन शिंदे यांचे शनिवारी दुपारी 2 वाजून 10 मिनिटांनी आकस्मित निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा रविवार 26 मार्च 2023 सकाळी 10.00 वाजता राहत्या घरापासून निघणार आहे.
सोमनाथ शिंदे यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी आहे परिवार आहे. यापूर्वी त्यांनी वृत्तवेध, वृत्तदर्पण या वाहिनी मध्ये पत्रकार म्हणून काम पाहिले होते. त्यानंतर त्यांनी मागील दोन वर्षापासून स्वतःचे एसएमएस न्यूज या नावाने चॅनल सुरू केले त्या माध्यमातून सर्व स्तरातील बातम्या ते संकलित करीत होते त्यांच्या या अकस्मात मृत्यूने शिंदे व होटकर परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

















