सोलापूर : जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचा वाढदिवस शनिवारी मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला जिल्हा परिषदेमध्ये सर्व अधिकारी यांनी कर्मचाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.
कार्यालयाबाहेरही त्यांच्या निवासस्थानी सोलापूर शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवरांची त्यांना शुभेच्छा देण्यासाठी गर्दी झाली होती. काँग्रेस पक्षाचे शहर सरचिटणीस श्रीशैल रणधिरे व सामाजिक कार्यकर्ते गुरुशांत मोकाशी मित्रपरिवाराचे वतीने स्वामी यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी आमदार प्रणिती शिंदे यांचे स्वीय सहाय्यक बंटी चंदनशिवे, अतीश वाघमारे, किरण गायकवाड यांची उपस्थिती होती.


















