ओबीसींच्या सन्मानार्थ भारतीय जनता पार्टी सोलापूर शहरच्या वतीने आमदार विजयकुमार देशमुख यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या राहुल गांधी यांच्या विरोधी आंदोलनात दिवंगत नगरसेवक सुनील कामाठी यांचे चिरंजीव शिवकुमार सुनिलभाऊ कामाठी याने आपल्या टीमसह सहभाग नोंदविला.
या आंदोलनावेळी आमदार विजयकुमार देशमुख, मार्गदर्शक डॉ. किरण देशमुख, भाजपा शहराध्यक्ष विक्रम देशमुख, माजी विरोधी पक्षनेते नरेंद्र काळे, माजी नगरसेवक रविसिंह कैय्यावाले, युवा मोर्चाचे गणेश साखरे आदींची प्रत्यक्ष भेट झाली व भाऊंच्या आठवणी सांगत शिवकुमारला योग्य सल्ला दिला.
शिवकुमार ने पहिल्यांदाच राजकीय आंदोलनात सहभाग नोंदवित राजकीय पदार्पण केलं अशीच सर्वत्र चर्चा होती. यावेळी त्यासोबत मित्र परिवाराची लक्षवेधी उपस्थिती होती.
देश का नेता कैसा हो नरेंद्र मोदी जैसा हो…
ओबीसी चोर बोलणाऱ्या हरामखोर राहुल गांधीचा धिक्कार असो… ओबीसी के सन्मान में भाजपा मैदान में…काँग्रेसके अलाकमान राहुल गांधी का फर्मान करो ओबीसी का अपमान…राहुल गांधीच करायचं काय खाली मुंडी वर पाय…भारतीयांचा अपमान करणाऱ्या काँग्रेस पक्षाचा धिक्कार असो… अश्या विविध राहुल गांधी विरोधी व ओबीसी सन्मानार्थ घोषणांनी परिसर दाणाणून गेला होता.



















