सोलापूर : सोलापूर युवक काँग्रेस शहरअध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली उत्तर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष महेश लोंढे यांच्या वतीने सोलापुरातील भाजप पक्षाने राहुल गांधीच्या विरोधात उत्तर विधानसभा मध्ये टिळक चौक येथे आंदोलन केले होते त्याच ठिकाणी राहुल गांधी यांच्या प्रतिमेस दुग्धअभिषेक करून त्यांचा मानसन्मान करण्यात आला.
गणेश डोंगरे म्हणाले, मोदी व अदानी यांच्यात नेमका काय संबंध आहे? व 20000 कोटीचा घोटाळा नेमका कोणी केलेला आहे. या संदर्भामध्ये राहुल गांधी आगामी लोकसभेमध्ये प्रश्न विचार विचारणार होते व त्याच भीतीपोटी मोदी सरकारने दडपशाही करत खोटे गुन्हे दाखल करत लोकशाहीला पायदळी तुडवत राहुल गांधी यांचे खासदारकी रद्द केली. परंतु राहुल गांधी संसदेच्या बाहेर राहून देखील प्रश्न विचारतच राहणार व त्यांच्या मागे देशातील प्रत्येक युवक हा खंबीरपणे पाठीशी उभा राहील असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी प्रदेश सचिव प्रवीण जाधव, श्रीकांत वाडेकर, शरद गुमटे, तिरुपती परकीपंडला, प्रवीण वाले, दीनानाथ शेळके, संजय गायकवाड, महेंद्र शिंदे, सुभाष वाघमारे, यासीन शेख, आशुतोष वाले, मनोहर चकोलेकर, आदित्य म्हमाणे, निखिल पवार, अभिजीत डोलारे, चंद्रकांत नाईक, अमित लोंढे, सिद्धार्थ पवार, विजय भोसले, अनिल हलकट्टी व इतर पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
















