सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार यांची प्रमोशन होऊन बदली झाली आहे त्यांना महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण वरळी मुंबई येथे वित्त नियंत्रक या पदावर नियुक्ती देण्यात आली आहे. पवार यांच्या बदल्यात अध्यापि दुसरा अधिकारी देण्यात आला आला नाही.
राज्याच्या वित्त विभागाने राज्यातील 33 अधिकाऱ्यांच्या प्रमोशन पर बदल्या केल्या आहेत. त्यामध्ये अजयसिंह पवार यांचा समावेश आहे. यापूर्वी पवार हे सोलापूर महानगरपालिकेत मध्ये मुख्य लेखापरीक्षक होते त्यानंतर त्यांची बदली सन 2021 मध्ये सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये मुख्य वित्त व लेखा अधिकारी या पदावर झाली. अतिशय प्रामाणिक अधिकारी म्हणून त्यांची प्रशासकीय पातळीवर ओळख आहे. यापूर्वी उपमुख्य लेखा वित्त अधिकारी म्हणून त्यांनी सोलापूर जिल्हा परिषदेमध्ये काम पाहिले होते.



















