सोलापूर : भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माहिती पत्रकार परिषद घेण्यात आली. या पत्रकार परिषदेला अध्यक्ष अजित गायकवाड, कार्याध्यक्ष अंजना गायकवाड, सरचिटणीस शुभम सोनकांबळे, खजिनदार शरणू हजारे, सुभानजी बनसोडे, सुबोध वाघमोडे, प्रवीण निकाळजे, राजा कदम, शशी कांबळे, सुशील सरवदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
सन 2023 चे जयंती उत्सव समितीचे पदाधिकारी नेमण्यासाठी उत्सव समितीची बैठक शुक्रवार दिनांक 31 मार्च रोजी सायंकाळी साडेपाच वाजता डॉक्टर आंबेडकर मेमोरियल हायस्कूल फॉरेस्ट या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे. या बैठकीबाबत अधिक माहिती अजित गायकवाड यांनी दिली.

















