सोलापूर : भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्ताने डॉ बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव विश्वस्त समितीच्यावतीने आंबेडकर मेमोरियल हायस्कुल याठिकाणी नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी अजित गायकवाड होते.
आपल्या मनोगतात माजी नगरसेवक रवी गायकवाड यांनी उपस्थितांच्या शिट्ट्या व टाळ्या मिळवल्या. मी आज बैठकीला येणार नव्हतो, पण तुम्हाला वाटेल ‘रवी बॉस’ने घुमजाव केले का? म्हणून आलो. आपल्या मिरवणुकीला डॉल्बी परवानगी मागण्याची गरज नाही, पण सोलापुरात यापूर्वी निघालेल्या महापुरुषांच्या मिरवणुकीत पोलीस प्रशासनाने जसे सहकार्य केले तसेच पोलीस आपणास सहकार्य करेल.

















