सोलापूर : डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समितीची बैठक शुक्रवारी संपन्न झाली. मागील वर्षी सोलापुरात भीमसैनिकांमध्ये दोन गट पडून जयंती उत्सव महामंडळाची स्थापना झाली.
तोच धागा पकडून विश्वस्त समितीचे सदस्य ज्येष्ठ नेते राहुल सरवदे हे जे बोलायचे ते बोलून गेले. नकळत त्यांनी महामंडळातील नेत्यांना लक्ष केले, जयंतीच्या मिरवणुकीमध्ये केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगवान गौतम बुद्ध हेच दिसावेत इतर कोणत्याही कार्यक्रमातील फोटो, वर्षभर घेतलेले कार्यक्रम अजिबात दाखवू नका असे सांगून ‘भीमसैनिक हे विकलेले नसतात तर शिकलेले असतात’ असे म्हणत त्यांनी आपला निशाणा साधला.


















