सोलापूर : महानगरपालिका परिवहन समितीचे माजी सभापती काँग्रेसचे कार्यकर्ते इम्तियाज अल्लोळी यांचे सोमवारी पहाटे अल्पशा आजाराने निधन झाले. मृत्यू समय त्यांचे वय 55 होते त्यांच्या पश्चात पत्नी, मुले असा परिवार आहे. जिल्हा परिषद परिसरातील नॅशनल आपारमेंटमधील त्यांच्या राहत्या घरातून दुपारी दोन वाजता त्यांचे अंत्ययात्रा निघणार असून चिराग अली कब्रस्तान मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली.
इम्तियाज अल्लोळी यांनी सोलापूर महानगरपालिका परिवहन समितीचे सभापती म्हणून यापूर्वी काम पाहिले. 2014 मध्ये त्यांच्यासोबत असलेले काँग्रेस मधील अनेक नेते एम आय एम मध्ये गेले मात्र ते काँग्रेस सोबत एकनिष्ठ राहिल्याचे दिसून आले. निधनाचे वृत्त कळताच माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन कुटुंबीयांचे सांत्वन केले आणि त्यांना श्रद्धांजली वाहिली.


















