सोलापूर : जिल्ह्यातील तहसीलदार व नायब तहसीलदार यांचे आपल्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारातील संजय गांधी निराधार योजनेच्या कार्यालयासमोर हे काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
नायब तहसीलदार अन्य विभागाच्या कामानिमित्य समन्वयाची व नियंत्रणाची यासह कार्यकारी दंडाधिकारी म्हणून कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी सांभाळत असल्यामुळे सन १९९८ मध्ये शासनाने नायब तहसिलदार पदास राजपत्रित वर्ग -२ चा दर्जा दिला असताना व प्रदिर्घ कालावधीपासून संवैधानीक मार्गाने अस्तित्वाची न्याय मागणी मंजूर करण्यास शासनाकडे विनंती करीत असतांना देखील अद्यापही मागणी मंजूर झालेली नाही. त्यामुळे नाईलाजास्तव महसूल विभागाचे बेमुदत कामबंद आंदोलन करत असल्याचे सांगत मागणी मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा तहसीलदार व नायब तहसीलदार संघटनेचे अध्यक्ष सुशील बेल्हेकर व एस सी परदेशीमठ यांनी दिला.
या आंदोलनात तहसीलदार जयंत पाटील, दत्तात्रय मोहाळे, चंद्रशेखर लिंबारे, बाळासाहेब शिरसाट, संजय भंडारे, सुधाकर बंडगर, बालाजी बनसोडे, जयश्री पंचे, स्मिता गायकवाड, आरती दाबाडे, चंद्रकांत हेडगिरे, प्रवीण घम, मनोज सोत्री, दत्तात्रय गायकवाड यांच्यासह तहसीलदार व नायब तहसीलदार मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत.
आंदोलन स्थळी सावली असलेल्या ठिकाणी हायटेक मंडप टाकून बसण्यासाठी रेड कार्पेट अंथरण्यात आले असल्याने हे आंदोलन ‘काम बंद’ की ‘क्लास वन’ अशी चर्चा आता सुरू झाली आहे.
.jpg)

















