Sunday, November 8, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सुशीलकुमारांच्या वारसदार प्रणिती शिंदेंना सोलापूर लोकसभा मिळवण्याची संधी ; विधानसभेला आखावी लागणार अशी रणनीती | Sinhasan Special Report

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
4 April 2023
in solapur
0
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : महाराष्ट्रातून राहुल गांधी यांच्या अतिशय जवळ असलेला कार्यकर्ता म्हणून आता काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांची ओळख निर्माण झाली आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या राजकीय वारसदार म्हणून आमदार ताई सध्या काम पाहत आहेत. सुशीलकुमार शिंदे यांनी लोकसभेच्या नेते पदापर्यंत मजल मारली त्याच पावलावर पाऊल ठेवून प्रणिती शिंदे या आपली राजकीय वाटचाल करीत आहेत.

देशात महागाई, भ्रष्टाचार, गॅस दरवाढ, राहुल गांधी यांच्यावर झालेली कारवाई त्यामुळे भाजपच्या विरोधात आपोआप वातावरण तयार होऊ लागले आहे. महाराष्ट्रामध्ये पाडापाडीचे राजकारण भाजपने केल्याने जनता महाविकास आघाडीच्या बाजूने असल्याचे नुकत्याच झालेल्या पदवीधर आणि विधानसभेच्या पोटनिवडणुकांवरून दिसून आले.

सोलापूर लोकसभेला काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांना दोन वेळा पराभवाला सामोरे जावे लागले परंतु आमदार प्रणिती शिंदे या आता मैदानात उतरल्याने वातावरण बदलत असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. यंदा सोलापूर लोकसभा ताब्यात घेण्याची नामी संधी काँग्रेसला असल्याचे चित्र दिसून येते. सुशीलकुमार शिंदे यांचे जिल्ह्यात दौरे वाढले आहेत त्याच पार्श्वभूमीवर आमदार प्रणिती शिंदे यांनी शहर मध्यतून बाहेर पडून आता जिल्ह्यात दौरे वाढविण्याची गरज आहे.

पक्ष अडचणीत असताना पक्षाला अनेक नेते सोडून गेले त्यामध्ये माजी खासदार धर्मांण्णा साधूल, माजी महापौर महेश कोठे, माजी शहराध्यक्ष सुधीर खरटमल, माजी महापौर यु एन बेरीया, माजी नगरसेवक तौफिक शेख, माजी महापौर नलिनी चंदेले यांचा समावेश आहे. पण ते कितपत त्या पक्षात राहतील हा सुद्धा संशोधनाचा विषय आहे.

जिल्हाध्यक्ष धवलसिंह मोहिते पाटील यांच्या कामकाजावरही ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पाहायला मिळते. कुठले आंदोलन नाही, निवेदन नाही, कधी तर दोन महिन्याला जिल्हाध्यक्ष येतात बैठक घेतात आणि निघून जातात असे काहीसे चित्र आहे. माढा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पार्टी मजबूत होत चालल्याने तिकडचा विचार सोडता सोलापूर लोकसभा ताब्यात घेण्यासाठी याच भागातला जिल्हाध्यक्ष नेमणे तितकेच गरजेचे आहे.

सोलापूर लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघाचा विचार केल्यास शहर मध्य हा तर काँग्रेसचा बालेकिल्ला. त्या ठिकाणी आमदार प्रणिती शिंदे यांना कोणत्याही पक्षाचे आव्हान दिसून येत नाही. अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचा विचार केला तर सध्या भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी हे मजबूत अवस्थेत दिसून येतात मात्र कल्याणशेट्टी विरोधकांनी माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांना सहकार्य केले तर त्या ठिकाणी निश्चितच पुन्हा काँग्रेसचा आमदार पाहायला मिळेल.

दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला मात्र काँग्रेसच्या अंतर्गत गटबाजीमुळे सध्या तो भाजपच्या ताब्यात आहे.  2019 च्या विधानसभेचे चित्र पाहिले तर ग्रामीण भागातून भाजपला स्पष्ट नाकारले आहे त्यामुळे आमदार सुभाष देशमुख हे आता नदीपट्ट्याच्या शेतकऱ्यांसोबत आंदोलन करताना पाहायला मिळत आहेत. 

माजी आमदार दिलीप माने यांची उत्तर आणि दक्षिण मध्ये पकड चांगली आहे परंतु त्यांच्या पक्ष आणि भूमिका स्पष्ट नसल्याने कार्यकर्त्यांमध्येही संभ्रमाचे वातावरण पाहायला मिळते. म्हणून दक्षिण तालुक्यात  काँग्रेस नेते सुरेश हसापुरे  यांना मानणारा मोठा वर्ग आहे, तळागाळात जाऊन कामे करण्यास ते प्राधान्य देत असल्याने आणि दक्षिण तालुक्यात काँग्रेसला अजूनही जनाधार असल्याने निश्चितच हसापुरे यांच्या रूपात काँग्रेसला आमदार भेटू शकतो. आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी राजकीय चाणक्य म्हणून हसापूरे यांची ओळख आहे त्यांना सोबत घेऊन आमदार प्रणिती शिंदे यांनी रणनीती आखली तर निश्चितच जिल्हा परिषद, जिल्हा मध्यवर्ती बँक, बाजार समिती व इतर सहकारी संस्था यामध्ये प्रणिती शिंदे यांचा दबदबा राहील.

शहर उत्तरच्या बाबतीत हा मतदारसंघ जागा वाटपामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आपल्याकडे मागू शकतो त्या बदल्यात मंगळवेढा-पंढरपूर हा मतदारसंघ आपल्याकडे घ्यावा असे बोलले जात आहे. मंगळवेढ्याचे आमदार समाधान अवताडे हे मंगळवेढ्यात फॉर्मात आहेत मात्र पंढरपूर मध्ये परिचारक-अवताडे गटातील असलेल्या गटबाजीचा फायदा काँग्रेस राष्ट्रवादीला होऊ शकतो. मंगळवेढ्याच्या बाजार समितीच्या निवडणुकीनंतर अवताडे यांची ताकद समोर येईल.

मोहोळ मतदारसंघ हा सध्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटबाजीतून जात आहे. राष्ट्रवादीमध्ये माजी आमदार राजन पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील यांच्यातील गटबाजीचा फायदा भाजप घेत आहे. भाजपचे विजय डोंगरे गट सोडला तर भाजप कुमकुवत आहे त्या ठिकाणीही पुन्हा काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना विचाराचा आमदार निश्चित होईल.

SendShareTweetSend
Previous Post

होटगी ग्रामपंचायत सदस्य इंद्रजित लांडगे यांची आमसभेत जोरदार मागणी ; प्रशासनाला द्यावे लागले उत्तर

Next Post

हजारोंच्या नयनांनी अनुभवला कावडी चढविण्याचा सोहळा ; झेडपीच्या सेस मधून पाच लाख यात्रा निधीची सीईओंची घोषणा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

हजारोंच्या नयनांनी अनुभवला कावडी चढविण्याचा सोहळा ; झेडपीच्या सेस मधून पाच लाख यात्रा निधीची सीईओंची घोषणा

ताज्या बातम्या

ब्रेकिंग ! मोहिते पाटील, शिंदे, माने, हसापुरे, पाटील, परिचारक, म्हेत्रे, आवताडे, बागल यांचे अर्ज बाद ; सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, राजेंद्र राऊत, समाधान आवताडे, धैर्यशील मोहिते पाटील, बाबासाहेब देशमुख यांचे अर्ज मंजूर

3 November 2026
सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

ब्रेकींग: बार्शी, मंगळवेढा, मोहोळ बिनविरोध? ; खासदार आमदारांसह हसापूरे यांचे शक्ती प्रदर्शन ; एक खासदार अन् सहा आमदारांची उमेदवारी

30 October 2026
सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

सुभाष देशमुख, सचिन कल्याणशेट्टी, म्हेत्रे, राऊत, शिंदे, पाटील, शिवदारे, पवार यांच्यासह दिग्गजांचे अर्ज दाखल ; कुणाचा भाऊ तर कुणाचे पुतणे आले अर्ज भरायला

29 October 2026
सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

सोलापुरात भाजप वन-टू-वन टच मध्ये ; आमदार देवेंद्र कोठे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार प्रचार

16 October 2026
ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

November 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« Oct    

Our Visitor

2006540
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group