Wednesday, May 6, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

हजारोंच्या नयनांनी अनुभवला कावडी चढविण्याचा सोहळा ; झेडपीच्या सेस मधून पाच लाख यात्रा निधीची सीईओंची घोषणा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
5 April 2023
in solapur
0
0
SHARES
4
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

नातेपुते ता.२(प्रतिनिधी ) महाद्या धाव – महाद्या धाव अशी आर्त हाक देत, अतिशय उत्साही अन रोमहर्षक वातावरणात मुंगी घाटातून कावडी चढविण्याचा सोहळा आज लाखो भाविकांच्या साक्षीने पार पडला.

श्री संत भुतोजी बुवा तेली उर्फ तेल्या भुत्याची कावड व इतर शेकडो मानाच्या कावडी आज कोथळे ता. माळशिरस येथील अतिशय अवघड व लहान असणाऱ्या मुंगी घाटातून मानवी साखळी करून सायंकाळी सात वाजता शिखर शिंगणापूरला पोहोचल्या. यावेळी हजारो भाविक स्वागतास उभे होते.

महाराष्ट्राचे आराध्य व छत्रपती शिवरायांचे कुलदैवत असणाऱ्या शिखर शिंगणापूरच्या शंभू महादेवाची वार्षिक यात्रा लाखो भाविकांच्या उपस्थितीत सुरू आहे.  रविवार चैत्र शुद्ध द्वादशी हा यात्रेचा मुख्य दिवस असतो. महाराष्ट्रांतून आलेल्या हजारो कावडीने जलाभिषेक करून शंभू महादेवाचे दर्शन घेतले. तेल्या भुताच्या कावडीने दुपारी तीन वाजता कोथळे येथे आगमन झाले. यावेळी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य  अधिकारी दिलीप स्वामी, पुरंदरचे आमदार संजय जगताप, माळशिरस पंचायत समितीचे माजी उपसभापती अर्जुनसिंह मोहिते पाटील, माजी सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील, पोलिस उपअधीक्षक डॉ बसवराज शिवपुजे, प्रभारी तहसीलदार तुषार देशमुख, नायब तहसीलदार आशिष सानप, अप्पर तहसीलदार अजिंक्य घोडगे, सपोनि प्रविण संपांगे यांनी स्वागत करून पूजन केले. यावेळी कोथळेच्या सरपंच वर्षा गुरव, उपसरपंच तानाजी किसवे, श्री शंकर कारखान्याचे संचालक चंद्रकांत शिंदे, प्रताप पाटील, शोभा साठे  उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी सहकुटुंब सोहळा अनुभवला यावेळी त्यांनी भक्तांच्या मूलभूत सुविधांसाठी जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून यात्रा निधीसाठी पाच लाख देण्याची घोषणा केली.

इतर कावडी दुपारपासून मुंगी घाटातून मार्गस्थ होत होत्या. मानाच्या तेल्या भुत्याच्या कावडीची पहिली आरती पाच वाजता झाली. कावड पाच वाजून दहा मिनिटांनी घाटाच्या पायथ्याला आली. यावेळी अंदरुड ता. फलटण येथील वाटाड्याची मानाची कावड सोबत होती. ६.३०वा. कावडीची मानकर्यांच्या  हस्ते आरती होऊन कावड घाटाला लागली. यावेळी फटाक्याची मोठ्या प्रमाणात आतषबाजी करण्यात आली. 

हर हर महादेव, महाद्या धाव महाद्या धाव अशा घोषणा दरी कपारीतून घुमत होत्या. अतिशय अवघड व जिंकरीचा असणारा हा घाट अतिशय शिस्तीत मानवी साखळीने भक्त पार करीत होते. सासवड परिसरातील लोकांच्या बरोबरीनेच कन्हेर, कोथळे ता.माळशिरस येथील शेकडो तरुण कावडीला घाट चढण्यासाठी मदत करत होते. अवघड टप्पे पार करीत असताना खालून भाविक टाळ्या वाजवून घोषणा देत कावडी धारकांना प्रोत्साहन देत होते. 

सायंकाळी ८.१५ वाजता कावड शिखर शिंगणापूरला पोहोचली. यावेळी छत्रपती खासदार उदयनराजे भोसले, राजमाता कल्पना राजे भोसले, विविध खात्यांचे अधिकारी, तहसीलदार, सरपंच पुजारी बडवे, मानकरी यांनी स्वागत केले.

रणरणत्या उन्हात सकाळ पासून लाखो भाविक कावडी चढविण्याचा सोहळा पाहण्यासाठी जागा मिळेल तेथे बसून होते. भक्ती आणि शक्तीचा अनोखा थरार अनुभवायला आज मुंगी घाटात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो लोक आले होते. पोलिस उपअधीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक, चार फौजदार, सत्तर पोलिस कर्मचारी, खाजगी बारा कमांडो यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ रामचंद्र मोहिते व ग्रामसेवक रवींद्र पवार,अनिता बलाक्षे वाणी आरोग्य पथक, रुग्णवाहिका सकाळ पासून हजर होत्या. सोलापूर सोबत सातारा जिल्ह्यातील रुग्णवाहिका तैनात होत्या.

SendShareTweetSend
Previous Post

सुशीलकुमारांच्या वारसदार प्रणिती शिंदेंना सोलापूर लोकसभा मिळवण्याची संधी ; विधानसभेला आखावी लागणार अशी रणनीती | Sinhasan Special Report

Next Post

बोरामणी गावात श्रीराम मंदिराचे भूमिपूजन अन् उत्साहात रंगला भव्य मिरवणूक सोहळा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

बोरामणी गावात श्रीराम मंदिराचे भूमिपूजन अन् उत्साहात रंगला भव्य मिरवणूक सोहळा

ताज्या बातम्या

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

सिंहगडच्या विद्यार्थ्यांचा आंतरराष्ट्रीय डंका; विजयोत्सव रॅलीतून महापुरुषांना अभिवादन

4 May 2026
सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

सोलापूरमधील कंत्राटदाराच्या २५ वर्षांच्या प्रवासाची प्रेरणादायी कहाणी ; कंत्राटदार ते उद्योजक

29 April 2026
अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

28 April 2026
सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

सोलापूर सीईओ कुशाल जैन निर्धार ; यंदाची आषाढी वारी…. ! हम भी कुछ कम नहीं

22 April 2026
रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

रखरखत्या उन्हात जिल्हाधिकारी ऑन फिल्ड ; कार्तिकेयन यांच्याकडून आषाढी यात्रेच्या ठिकाणची पाहणी

16 April 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

15 April 2026
खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

खासदार ज्योती वाघमारे यांची ‘ सिंहासन’ला भेट ; कौटुंबिक सोहळ्याने ताई भारावल्या!

14 April 2026
सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

सोलापुरात भीम जयंती निमित्त सामूहिक बुद्ध वंदना ; सर्वच प्रशासकीय अधिकाऱ्यांनी एकत्रित केले महामानवास अभिवादन

14 April 2026

क्राईम

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
28 April 2026
0

अय्यो ! फक्त तीन हजाराची लाच घेताना मंडल अधिकारी अँटी करप्शनच्या जाळ्यात वारस नोंद लावण्यासाठी मंडळ अधिकारी हेमंत चंद्रकांत फुलारी...

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले

by प्रशांत कटारे
29 March 2026
0

सोलापुरात दहा हजाराची लाच घेताना तलाठ्याला रंगेहाथ पकडले सोलापूर - सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत...

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला

by प्रशांत कटारे
15 March 2026
0

बाळू काळेला उच्च न्यायालयात जामीन मंजूर ; अथर्व जाधव खुन खटला अवैध व्यवसायातील पैशाच्या हिशोबाच्या वादातून अथर्व जाधव याचा खुन...

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

May 2026
M T W T F S S
 123
45678910
11121314151617
18192021222324
25262728293031
« Apr    

Our Visitor

1979118
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group