सोलापूर : जिल्हा परिषदेचा बंद पडलेला गुणवंत कर्मचारी पुरस्कार तात्काळ चालू करावा म्हणून कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने प्रशासनाकडे सन २०१८ पासून आजतागायत पाठपुरावा केला होता. त्यानुसार सामान्य प्रशासनाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दखल घेवून आदर्श अधिकारी/कर्मचारी पुरस्काराची सुरुवात दिनांक ०५ एप्रिल २०२३ पासून आयोजनाबाबत परिपत्र जारी करुन सर्व खातेप्रमुख, सर्व गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना कर्मचा-याचे प्रस्ताव दिनांक ११ एप्रिल २०२३ पर्यंत सामान्य प्रशासन विभागास सादर करण्यास कळविलेले आहे.
यासाठी जिल्हा स्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. संघटनेने सतत पाठपुरावा करून गुणवंत कर्मचारी पुरस्कार चालू करण्याबाबत प्रशासनास विनती पत्रे दिली होती त्यानुसार प्रशासनाने संघटनेच्या पत्राची दखल घेवून गुणवंत कर्मचारी पुरस्कार चालू केल्याबद्दल संघटनेने आनंद व्यक्त केला आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, अति मुख्य कार्यकारी अधिकारी संदिप कोहिनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे व प्रशासनातील कक्ष अधिकारी, अधिक्षक, संबंधित कर्मचारी यांचे संघटनेच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष अरुण क्षीरसागर यानी आभार व्यक्त केले आहेत. या निर्णयामुळे जिल्हा परिषद मधील सर्व संवर्गीय कर्मचा-यामध्ये आनंदाचे वातावारण पसरले आहे.



















