सोलापूर : छत्रपती संभाजीराजे चौक येथील एका हॉटेल मालकाने आज शनिवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
सोमनाथ दगडोबा क्षीररसागर वय वर्षे 40 राहणार हांडे प्लॉट, सोलापूर यांनी शनिवार सकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान आत्महत्या केली असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी दिली.
शनिवारी सकाळी हॉटेल उघडण्यासाठी अण्णा कॅन्टींनचे मालक सोमनाथ हे गेले होते. हॉटेलमधील लोखंडी अँगलला वायरच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली अशी माहिती समोर येत आहे. काही वेळाने त्यांच्या लहान मुलाने हे दृश्य पाहून त्याच्या काकाला बोलावले आणि पुढील प्रकार उघडकीस आला.
घटनेची माहिती नातेवाईकांना मिळताच हॉटेल परिसरात त्यांची आणि परिसरातील नागरिकांची मोठी गर्दी केली होती. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून मृतदेह शवविच्छेदन साठी लादेन यांच्या ऍबुलन्समधून सिव्हिल हॉस्पिटल येथे पाठविण्यात आला आहे.


















