सोलापूर : जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे शनिवारी सोलापूर दौऱ्यावर येऊन गेले. या धावत्या दौऱ्यात पत्रकार परिषदेत बोलताना त्यांच्या उजव्या बाजूला शेजारी बसलेले आमदार सुभाष देशमुख यांनी तातडीने एक कागद घेऊन एक विषय लिहून दिला तो पालकमंत्र्यांना देताच त्यांनी त्याची माहिती दिली.
मंगळवेढा तालुक्यातील भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या विषयात सांगोल्यांमध्ये महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत योजनेची जी थकीत सुमारे एक कोटी 17 लाख हे वीज बिल सर्व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने भरायचे आणि तातडीने ही योजना सुरू करायची अशा सूचना पालकमंत्र्यांनी संबंधित यंत्रणांना केल्या आहेत. त्यामुळे मंगळवेढा तालुक्यातील अतिशय महत्त्वाची मानली जाणारी भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना सुरू होईल अशी अपेक्षा राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. पहा तो व्हिडीओ…


















