राज्यातील कोतवालांसाठी मोठी खुशखबर आहे. आता कोतवालांचे मानधन वाढवण्यात आले आहे. कोतवालांच्या मानधनवाढीला राज्याच्या वित्त विभागाची नुकतीच मान्यता मिळाली आहे. कोतवालांचे मानधन आता 7 हजार 500 वरून 15 हजार रुपये झालेचे शासन निर्णय जाहीर केले आहे, असल्याचे राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटले आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 9 मार्च 2023 रोजी राज्याचा सन 2023-24 चा अर्थसंकल्प सादर केला तेव्हा कोतवालांच्या मानधनवाढीबाबत घोषणा केली होती.
सोलापूर जिल्ह्यातील, 378 कोतवाल कर्मचारी यांना 15 हजार रुपये इतके वेतन (मानधन ) शासन निर्णय नुसार दि. 01 एप्रिल 2023 पासून अनुज्ञेय असणार आहे, अशी माहीती विठ्ठल गुरव जिल्हाध्यक्ष यांनी दिली आहे.
राज्यातील कोतवाल यांना समान काम समान वेतन सरसकट १५००० रू मानधन वाढ करण्यात आली. शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्याबद्दल नामदार राधाकृष्णा विखे पाटील याचा सोलापूर जिल्हा कोतवाल संघटना वतीने सत्कार करण्यात आला आहे. यावेळी विठ्ठल गुरव जिल्हाध्यक्ष, अनिल जाधव सरचिटणीस, अवधूत पुजारी, मलिनाथ बाळगी, धानय्या हिरेमठ, समाधान सूर्यगंध, अर्जुन सणके, इरणा कांबळे, मलिनाथ कोळी, शिवशरण कोळी, दता कदम, सिद्धाराम अर्जुने, ऐश्वर्या कांबळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.



















