सोलापूर : लव्ह जिहाद व धर्मांतरण विषयात नगर पोलीस प्रशासनाला दिलेल्या निर्देश प्रमाणे,सोलापूरात देखील अंमलबजावणी करावी अशी मागणी भाजयुमोचे अक्षय अंजिखाने यांनी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना केली.
7 एप्रिल रोजी नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या शांतता समितीच्या बैठकीत महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी वाढत्या लव्हजिहाद व धर्मांतरण केसेसबाबत कडक शब्दात पोलीस प्रशासनाला सूचना केल्या होत्या व ज्या हद्दीत लव्हजिहाद व धर्मांतरण वाढत असतील त्या भागाच्या पोलीस निरीक्षकांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले होते व याच अनुषंगाने सोलापूरात देखील आपण पोलीस प्रशासनाला सूचना द्याव्यात अशी मागणी भाजयुमोचे अक्षय अंजिखाने यांनी केली.
यावेळी विखे पाटील यांनी तात्काळ त्या ठिकाणी उपस्थित असलेले पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांना लव्ह जिहाद व धर्मांतरण बाबतीत मी नगर येथे कडक सूचना थांबविण्यासाठी केल्या असून आपण देखील सोलापूरात या घटना रोखण्यासाठी कारवाई करावी अशा सूचना केल्या. याप्रसंगी आमदार सुभाष देशमुख, शहराध्यक्ष विक्रम देशमुख, नगरसेवक जगदीश पाटील, सागर अतनुरे, सतीश पारेली उपस्थित होते.




















