Tuesday, September 29, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

पोलीस आयुक्तालयाची कारवाई ; सराईत गुन्हेगार माशाळकर व वालेकर दोन वर्षासाठी तडीपार

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
10 March 2024
in crime
0
पोलीस आयुक्तालयाची कारवाई ; सराईत गुन्हेगार माशाळकर व वालेकर दोन वर्षासाठी तडीपार
0
SHARES
322
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पोलीस आयुक्तालयाची कारवाई ; सराईत गुन्हेगार माशाळकर व वालेकर दोन वर्षासाठी तडीपार

सोलापूर : आगामी काळात विविध जाती-धर्माचे सण-उत्सव, मिरवणुका व लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने सोलापूर शहर व परिसरात कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून शहरात कायदा व सुव्यवस्था तसेच शांतता अबाधित राहण्याच्या उद्देशाने सराईत गुन्हेगार वैजिनाथ उर्फ बबलु सुरेश वालेकर (वय-२९ वर्षे) याला पोलीस आयुक्तालय हद्द उर्वरित सोलापूर जिल्हा आणि उस्मानाबाद जिल्ह्यातून ०२ वर्षांकरिता तडीपार करण्यात आलंय.

तसेच सोलापूर पोलीस आयुक्तालय अंतर्गत विजापूर नाका पोलीस स्टेशनसह अन्य पोलीस ठाणे हद्दीत तसेच सोलापूर लोहमार्ग पोलीस ठाणे हद्दीत सराईत गुन्हे करणारा गुन्हेगार गणेश कल्लप्पा माशाळकर (वय- २४ वर्षे, रा. लिमयेवाडी, साई मंदिर जवळ, रामवाडी, सोलापूर) याला त्याच्या गुन्हेगारीचा आलेख लक्षात घेऊन पोलीस आयुक्तालयाने त्यास सोलापूर शहर उर्वरित सोलापूर जिल्हा आणि धाराशिव जिल्ह्यातून दोन वर्षाकरिता तडीपार केलंय.

वैजिनाथ उर्फ बबलु सुरेश वालेकर  (रा. कामती खुर्द, ता. मोहोळ) याच्याविरूध्द सोलापूर पोलीस आयुक्तालय अंतर्गत विजापूर नाका पोलीस ठाणे, सोलापुर ग्रामीण हद्दीतील सोलापुर तालुका आणि कामती पोलीस ठाणे परिसरात गुंडगिरी करणे, शिवीगाळ दमदाटी व मारहाण करुन दहशत निर्माण करणे तसेच त्या परिसरातील लोकांच्या मालमत्तेस हानी पोहचविणे व जबरी चोरी करणे अशा गंभीर स्वरूपाचे ०४ गुन्हे दाखल आहेत.

त्यामुळे त्याचेविरूध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५६ (१) (अ) (ब) प्रमाणे पोलीस उपायुक्त (परिमंडळ) यांचे आदेश पारित झाले होते. त्यास शनिवारी, ०९ मार्च रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशनकडून ताब्यात घेऊन सोलापूर शहर व उर्वरित सोलापुर जिल्हा व उस्मानाबाद जिल्हातून ०२ वर्षाकरीता तडीपार करण्यात आलंय.

गणेश माशाळकर याच्याविरुद्ध परिसरात गुंडगिरी करणे, शिवीगाळ दमदाटी व मारहाण करुन दहशत निर्माण करणे सदर परिसरातील लोकांच्या मालमत्तेस हानी पोहचविणे अशा प्रकारचे गंभीर स्वरूपाचे एकुण ०६ गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्याचेविरूध्द महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ५७ (१) (अ) प्रमाणे मा. पोलीस उपायुक्त परिमंडळ, यांचे आदेश पारित झाले होते. त्यास गुरुवारी, ०७ मार्च रोजी विजापूर नाका पोलीस स्टेशनकडून ताब्यात घेऊन सोलापूर शहर व उर्वरित सोलापुर जिल्हा व धाराशिव जिल्हातून दोन वर्षाकरीता तडीपार करण्यात आलंय.

Tags: M rajkumarSolapur commissioner of policeTadipar
SendShareTweetSend
Previous Post

सोलापूरकरांची फसवणूक थांबवा, अभ्यासु आणि सुसंस्कृत उमेदवार द्या….

Next Post

आ.प्रणिती शिंदेंचा लोकसभेचा प्रचार सुरू ; ‘सत्तेशी व टक्केशी’ मला काही घेणं देणं नाही ; तुमचा विषय मी चॅलेंज म्हणून स्वीकारणार

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
आ.प्रणिती शिंदेंचा लोकसभेचा प्रचार सुरू ; ‘सत्तेशी व टक्केशी’ मला काही घेणं देणं नाही ; तुमचा विषय मी चॅलेंज म्हणून स्वीकारणार

आ.प्रणिती शिंदेंचा लोकसभेचा प्रचार सुरू ; 'सत्तेशी व टक्केशी' मला काही घेणं देणं नाही ; तुमचा विषय मी चॅलेंज म्हणून स्वीकारणार

ताज्या बातम्या

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026
सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026

क्राईम

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

2001144
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group