सोलापूर : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागात आता मुख्याध्यापक, विस्तार अधिकारी आणि केंद्रप्रमुख यांचे प्रमोशन होणार आहे. त्यामुळे प्राथमिक शिक्षण विभाग कामाला लागला असून प्रभारी शिक्षणाधिकारी संजय जावीर यांनी प्रक्रिया सुरू केली आहे.
दरम्यान प्रमोशनने चार विस्तार अधिकाऱ्यांना नियुक्त करायचे आहे. त्या चार जागांसाठी सहा जण पात्र आहेत परंतु प्राथमिक शिक्षण विभागासमोर यात एक नवी डोकेदुखी अशी आहे समोर आले की, विस्ताराधिकारी पदाच्या प्रमोशनसाठी जे सहा जण पात्र आहेत त्या सहा ही जणांचे शिक्षण एकच आहे. जन्मतारीख ही एकच आहे त्यामुळे यांची निवड करायची कशी? असा प्रश्न विभागासमोर उभा राहिला.
शिक्षण अधिकारी जावीर यांनी या विषयावर बराच विचार केला. मार्ग कसा काढायचा, कोणावरही अन्याय होता कामा नये त्यासाठी त्यांनी वरिष्ठांचा सल्लाही घेतला. यातून ‘सुवर्ण मध्य’ काढताना त्यांनी असे ठरवले. या सहाही जणांच्या चिठ्ठ्या काढायच्या. त्या सहा मधून चारचिट्ट्या उचलायचा ज्यांची चार नावे येतील त्यांना विस्तार अधिकारी पदी प्रमोशन द्यायचे आणि उर्वरित दोघांना येणाऱ्या 31 मे रोजी जे विस्तार अधिकारी सेवानिवृत्त होणार आहेत त्यांच्या जागेवर प्रमोशन द्यायचे असा एक चांगला सुवर्णमध्य शिक्षणाधिकारी जावीर यांनी काढला असल्याची माहिती शिक्षण विभागातून मिळाले.

















