सोलापुरात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा प्रश्न चांगलाच पेटला आहे. माजी नगरसेवकांनी आंदोलन करण्यास सुरुवात केली असून यात आता गोल्डन नगरसेविका श्रीदेवी फुलारे यांनी उडी घेतली आहे. महापालिका आयुक्त शितल तेली उगले यांच्या कारभारावर जोरदार टीका केली. धरण “उशाला” आणि “कोरड” सोलापूरकरांच्या “घशाला” अशी अवस्था सोलापूरकरांची झाली असून महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांचे मात्र उजनी धरणावर केवळ फोटोसेशन या शब्दात त्यांनी टीका केली आहे.
सध्या प्रशासन आहे आणि उजनी धरण भरलेले असून सुद्धा सोलपुरातील जनतेचे पाण्यावाचून बेहाल होत आहे असे मत माजी नगरसेविका श्रीदेवी जॉन फुलारे यानी यावेळी मांडले.
सोलापूर शहराला पाच दिवसाला एकदा येत आहे सणा सुदीचे दिवस आहेत आत्ता 14 तारखेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे व रमजान महीना सुरु आहे तरी लवकरात लवकर याचे नियोजन करा अन्यथा येणाऱ्या भविष्य काळात मोठ्या प्रमाणात महानगरपालिकेवर भव्य असा मोर्चा काढण्यात येईल असा इशारा देखील माजी नगरसेविका फुलारे यांनी दिला.


















