सोलापूर : कर्नाटक राज्याची विधानसभा निवडणूक लागली आहे. काँग्रेस पक्षाचे राज्यातील वातावरण पाहून भारतीय जनता पक्षाने ही निवडणूक प्रेस्टीज’ केली आहे. महाराष्ट्रातील सर्व मंत्री व आमदारांना पक्षाने प्रचाराची जबाबदारी सोपवली आहे. त्यात सोलापुरातील दोन्ही आमदार देशमुखांचा समावेश आहे.
शुक्रवारी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त आमदार सुभाष देशमुख यांनी येऊन अभिवादन केले यावेळी पत्रकारांनी कर्नाटक निवडणुकीचा विषय काढला असता ते म्हणाले, मी सोलापूर दक्षिणचा आमदार असल्याने माझ्यावर बेळगाव दक्षिणची जबाबदारी दिली आहे मी आत्ताच निघालो अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.
काही वेळाने आमदार विजयकुमार देशमुख हे अभिवादनासाठी आले असता त्यांनाही पत्रकारांनी कर्नाटक निवडणुकीचा विषय काढला तेव्हा मलाही बेळगाव जिल्ह्यातील एका मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे आणि मी उद्या निघणार असे उत्तर त्यांनी दिले.

















