सोलापूर : उत्तर सोलापूरचे नूतन तहसीलदार सैपन नदाफ यांनी पदभार घेतला आहे. तत्कालीन तहसिलदार जयवंत पाटील यांची बदली झाली त्याच्या जागेवर बुलढाणा जिल्ह्यातील लोणार येथे कार्यरत असलेल्या सैपन नदाफ यांची नियुक्ती झाली.
नदाफ हे मुळ सोलापूर जिल्हयातील अक्कलकोट तालुक्यातील आहेत. नदाफ यांनी यापूर्वी चंद्रपूर जिल्ह्यात 3 वर्षे सहाय्यक पोलीस निरीक्षक या पदावर काम केले आहे. मंगळवारी डीके सोशल ग्रुपचे अध्यक्ष मोहसीन नदाफ मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
त्यावेळी DK ग्रुप के संस्थापक अध्यक्ष मोहसीन नदाफ, हमदन शेख, नबी नदाफ, सोनू सैयद, नजीर शेख, दाऊद शेख, शाहरुख नदाफ यांची उपस्थिती होती.




















