डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनानिमित्त विश्वरत्न बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने व रमजान सणाच्या पार्श्वभूमीवर शांतीनगर कलवल हॉल येथे रोजा इफ्तार पार्टी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या रोजा इफ्तार पार्टीमध्ये हिंदू मुस्लिम बांधवांनी एकमेकांना रमजान ईद सणाच्या शुभेच्छा देत एकात्मतेचे दर्शन घडवले.
कार्यक्रमाला एमआयडीसीचे पोलीस निरीक्षक माने, पप्पू गायकवाड, पांडुरंग सुरते, लक्ष्मण कटारे, किशोर गायकवाड, रामचंद्र कुचेकर, युवराज फडतरे, बाळासाहेब गायकवाड, अश्फाक रसभरे, काशीम भाई यांच्यासह परिसरातील मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.



















