Saturday, March 14, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात पी बी ग्रुपच्या आंबेडकर जयंती मिरवणुकीत राहणार या देखाव्याचे आकर्षण ; भव्य दिव्य वेधणार लक्ष

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
22 April 2023
in solapur
0
0
SHARES
1
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या १३२ व्या जयंतीचा समारोप रविवारी भव्य मिरवणुकीने होणार असून प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या (पी.बी. ग्रुपच्या) वतीने यंदाच्या मिरवणुकीत नुकतेच तेलंगणा राज्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ फूट पुतळ्याचे उद्घाटन झाले. त्या पुतळ्याची प्रतिकृती व बुद्धगया येथील महाबोधी महाविहाराची प्रतिकृती हे मिरवणुकीचे विशेष आकर्षण असल्याची माहिती प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे मार्गदर्शक आनंद चंदनशिवे यांनी दिले. 

नुकतेच १४ एप्रिल रोजी तेलंगणा राज्य सरकारने हैदराबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ फूट उंचीचा अतिभव्य पुतळा उभारून देशात सर्वात भव्य स्मारक उभे केले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या त्या पुतळ्याची माहिती मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या आंबेडकरी अनुयायांना व्हावी या उद्देशाने २० फूट उंचीचा पुतळा प्रतिकृती द्वारे मिरवणुकीत भीम अनुयायांना पहावयास मिळणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भव्य पुतळ्यासमोरच छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, राजर्षी शाहू महाराज, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आदी महापुरुषांचे पुतळे सुद्धा असणार आहेत. तसेच त्यागमूर्ती माता रमाई यांची १५ × २५  फुटाची भव्य प्रतिमा डॉ.बाबासाहेबांच्या पुतळ्यामागे असणार आहे व त्यास विविध छटांच्या रंगीत लाईटचा इफेक्ट व विविध फुलांच्या माळा यामुळे हा प्रसंग नेत्रदीपक असा दिसणार आहे.               

त्याचप्रमाणे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी धम्मचक्र प्रवर्तन करून या देशात धम्मक्रांती केली. बौद्ध धम्माचे संस्थापक भगवान गौतम बुद्ध यांना बुद्धगया येथे बुद्धत्व प्राप्त होऊन ते सम्यक संबुद्ध झाले व ‘बुद्ध’ म्हणून सर्वत्र ओळखून जाऊ लागले. जगातील बौद्धांचे पवित्र स्थळ म्हणून महाबोधी महाविहार प्रसिद्ध आहे. या स्थळाला जागतिक वारसा स्थान म्हणून मान्यता मिळालेली आहे. अशा पवित्रस्थान असलेल्या महाबोधी महाविहाराचे १४ × २४ फूट उंचीची प्रतिकृती व सात फूट भगवान बुद्धाची मूर्ती व अन्य सजावट हे यंदाच्या मिरवणुकीतील विशेष आकर्षण आहे.      

मागील पंधरा दिवसापासून या देखाव्याच्या तयारी करिता आनंद चंदनशिवे यांच्या संकल्पनेनुसार व मार्गदर्शनाखाली आर.के. डेकोरेटर्स, पुणे यांच्यामार्फत करण पवार व त्यांचे ७ ते ८ सहकारी तसेच मोझेस डेकोरेटर्स अँड इव्हेंट मॅनेजमेंटचे कारागीर मागील ७ ते ८ दिवसापासून कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे प्रबुद्ध भारत तरुण मंडळाच्या (पी.बी ग्रुपच्या) वतीने केलेल्या सामाजिक उपक्रमाची माहिती एल.ई.डी. द्वारे जनतेसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मंडळाच्या वतीने महिनाभरापासून याबाबतचे नियोजन करण्यात येत असून एक आगळ्या आणि वेगळ्या पद्धतीने डॉ.बाबासाहेब आंबेडकर व तथागत भगवान बुद्धाचा प्रतिकात्मक देखावा सादर होणार आहे. आनंद चंदनशिवे यांच्या संकल्पनेतून साकारणाऱ्या मिरवणुकीतील या देखाव्याच्या कामात पी.बी. ग्रुपचे प्रमुख गौतम चंदनशिवे, माजी नगरसेवक गणेश पुजारी, जयंती उत्सव मंडळाचे अध्यक्ष अमित बनसोडे, कार्याध्यक्ष आदित्य चंदनशिवे व सचिव महेश शिंदे हे परिश्रम घेत आहेत.

SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात रमजान ईदचा सर्वत्र उत्साह ; युवकांनो भडकू नका.., आपण उत्तर शिक्षणातून देणार आहोत

Next Post

सोलापूर जिल्ह्याचा उमेद अभियानात महाराष्ट्र राज्यात डंका ; उत्कृष्ठ कामाचे झाले कौतुक

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

सोलापूर जिल्ह्याचा उमेद अभियानात महाराष्ट्र राज्यात डंका ; उत्कृष्ठ कामाचे झाले कौतुक

ताज्या बातम्या

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

सोलापुरात भाजपचे ऐतिहासिक यश ; 11 पैकी 10 पंचायत समितीवर भाजपचा सभापती ; मोहोळ मध्ये मुस्लिम समाजाला संधी

12 March 2026
सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

सर्वपक्षीय नेत्यांच्या उपस्थितीत रंगला महापालिकेत हा उद्घाटन सोहळा

10 March 2026
बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बोरामणीत नागरिकांच्या चेहऱ्यावर दिसले ‘समाधान’ ; प्रशासनाच्या शिबिरास ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

9 March 2026
नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

नगरसेवकांच्या सत्कारातून शहर विकासाचा जागर ; उद्योगवर्धिनी आणि केतन वोरा मित्र परिवाराचा उपक्रम

4 March 2026
प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

प्रभाग‎ २२ साठी‎ आरोग्याचा‎ नवा‎ श्वास ! सोनी नगर‎ येथे नूतन‎ ‘आरोग्यवर्धिनी‎ केंद्र’‎ सुरू

27 February 2026
बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

12 February 2026
सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

सोलापुरात दोन आजी माजी आमदारांना पुत्र पराभवाचा धक्का ; एकीकडे मात्र मुलगा मुलगी आले निवडून

10 February 2026
सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

सासऱ्यासाठी जावयाची अन् मुलीची वडिलांसाठी अशी ऍडजस्टमेंट तर दुसरीकडे आईची मुलीसाठी माघार

28 January 2026

क्राईम

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष

by प्रशांत कटारे
12 February 2026
0

बायकोला सिगारेटचे चटके देणाऱ्या जावयाचा खुन : प्रकरणात सासु, मेव्हणा निर्दोष मोहोळ येथील क्रांती नगर मध्ये दि. १७/०६/२०१९ रोजी दुपारी...

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून

by प्रशांत कटारे
2 January 2026
0

सोलापुरात मनसे विद्यार्थी सेनेच्या शहराध्यक्षाचा खून सोलापूर महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शहरात राजकारण तापले असतानाच जोशी गल्ली भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या...

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
15 December 2025
0

ब्रेकिंग : सोलापुरात 40 हजाराची लाच घेताना नायब तहसीलदार अँटी करप्शनच्या जाळ्यात सोलापूर : मंडल अधिकाऱ्याचे वेतन काढण्यासाठी 40 हजाराची...

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका

by प्रशांत कटारे
25 November 2025
0

सोलापुरातल्या धाकट्या राजवाड्यातील दोन टोळ्या तडीपार ; पोलिसांचा दणका सोलापूर शहर पोलिसांनी टोळीच्या माध्यमातून गुन्हे करणाऱ्या दोन टोळ्यांना एकाच वेळी...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

March 2026
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
3031  
« Feb    

Our Visitor

1971568
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group