सोलापूर : राज्यामध्ये सत्ता बदलाचे चर्चा आता जोरदार होऊ लागली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राजीनामा देतील आणि त्यांच्या जागेवर अजित पवार मुख्यमंत्री होतील असेही बोलले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार हे मंगळवारी सोलापूर दौऱ्यावर होते.
त्यांच्या पत्रकार परिषदेत राज्यातील सत्ता बदलाचा विषय पत्रकारांनी उपस्थित केला तसेच राजकीय नेत्यांच्या चांगला आणि वाईट संदर्भात मुनगंटीवार यांनी भाष्य केले. त्यावर अजित पवार चांगले की वाईट? ते कोणत्या कॅटेगिरीमध्ये ते बसतात असा प्रश्न केला असता त्यांनी अजित पवार आमच्या सोबत आले तर चांगली गोष्ट आहे. रेडिओ जर सोलापुरात वाजवला तर स्टेशन इथले वाजेल आणि मुंबईत वाजवला तर मुंबईतील भाषा देशभक्ती, राष्ट्रभक्ती हे आपोआप वाजेल असे म्हणून नकळत अजित पवारांना त्यांनी पाठिंबा दर्शवल्याचे दिसून आले नक्की काय म्हणाले मुनगंटीवार पहा हा व्हिडिओ….


















