Friday, June 26, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापूर झेडपी ‘कॅफो’ अजयसिंह पवार यांच्या निरोप समारंभाला सभागृह ‘ हाऊसफुल्ल ‘ ; कार्यकर्तुत्व ऐकून पवार ही भारावले ! स्वामींनी दिली थेट ही उपमा

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
26 April 2023
in solapur
0
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : जिल्हा परिषदेमधील मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजयसिंह पवार म्हणजे अधिकारी कमी पण सर्वांचे मित्र अशी ओळख झालेला माणूस. त्यांची एका महिन्यापूर्वी प्रमोशन होऊन म्हाडा मुंबईच्या वित्त नियंत्रक पदी नियुक्ती झाली. त्यांना जिल्हा परिषद सोडण्याच्या मनस्थितीत नव्हती. परंतू प्रमोशन असल्याने त्यांना जाणे भाग पडत आहे. 

अखेर एका महिन्यानंतर बुधवारी त्यांच्या सत्कार आणि निरोप समारंभ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात कार्यक्रम आयोजित केला होता. त्या कार्यक्रमाला सभागृह  तुटुंब भरले होते. बसायला जागा नव्हती, बरेच कर्मचारी उभे राहून कार्यक्रम पहात होते. यावरुन अजयसिंह पवार यांच्या कार्याचा सन्मान दिसून आला.

मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, गटविकास अधिकारी आवर्जून उपस्थित होते.

सीईओ स्वामी यांनी, खऱ्या अर्थाने माणसातला देव माणूस अजय पवार या शब्दांत वर्णन केले. मी त्यांना संताची उपमा देतो, संतांचे विचार आचरणात आणनारा माणूस आहे. अधिकारी, माणूस, डॉक्टर असे तीन प्रकार त्यांच्या व्यक्तिमत्त्वात मला पहायला मिळाले. ते पर्यावरण प्रेमी आहेत, जिल्हा परिषदेमध्ये काम करताना मोठं सहकार्य लाभले, त्यांचा आदर्श इतरांनी घ्यावा असे आवाहन केले. 

एका महिन्यात सीईओ पदावर काम करण्याची संधी मिळाली, मार्च एंड मोठे आव्हान होते, माझ्या कामाची पद्धत फास्ट आहे पण कॅफो अजय पवार यांच्या सोबत काम करताना अडचण जाणवली नाही, एक चांगले मित्र ते झाले, अशा भावना व्यक्त करत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी पवार यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अर्थ विभागाला खऱ्या अर्थाने माणुसकी मिळवून देणारा अधिकारी म्हणून अजयसिंह पवार यांची ओळख जिल्हा परिषदेमध्ये राहील असे सांगत त्यांच्या पुढील वाटचालीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी इशाधीन शेळकांदे यांनी शुभेच्छा दिल्या.

सत्काराला उत्तर देताना पवार म्हणाले, आयुष्यात महापुरुषांची पुस्तके वाचली, त्यांच्या काळची जाणीव मनात बाळगून त्यांचे विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न केला आहे.  मला निरोप का देता, माझं माहेर सोलापूर आहे असाही प्रश्न त्यांनी उपस्थित केला. काम करताना प्रामाणिकपणे करा, आयुष्यात काटकसर करा, राष्ट्र संपत्तीचा योग्य वापर करा असा सल्लाही त्यांनी कर्मचाऱ्यांना दिला. 

जिल्हा परिषद कॅफो पदावर काम करताना अजयसिंह पवार हे झेडपीत मानाचा तुरा असल्याचे गौवोद्गार उपमुख्य कॅफो उत्तम सुर्वे यांनी काढले.

पाणी व स्वच्छता विभागाचे सचिन जाधव यांना बोलताना गहिवरून आले, जाधव यांच्या दिवंगत पत्नी आजारी असताना पवार यांनी केलेले सहकार्य याची जाणीव बोलून दाखवली.

नावात सिंह आहे पण कधी सिंहासारखे वागले नाहीत, आडनाव पवार असल्याने त्याला राज्यात तोड नाही अशा शब्दांत कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी यांनी त्यांच्या कार्याचा गौरव केला. असा अधिकारी कायम मनात घर करुन राहील असेही ते म्हणाले. 

अजयसिंह पवार यांचे ह्रुदयात स्थान कायम राहील अशी भावना व्यक्त करत विवेक लिंगराज यांनी त्यांच्या कार्याची माहिती दिली. 

जिल्हा परिषदेच्या कॅफो पदाला पवार यांनी एक उंची निर्माण करुन दिली. अधिकारी पदापेक्षा चांगला माणूस म्हणून त्यांनी नाव कमावले असे गौवोद्गार शिक्षणाधिकारी जावेद शेख यांनी काढले.

अजयसिंह पवार यांचे नाव सांगितले की, राज्यात कुठेही काम होते या शब्दांत गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. 

समाज कल्याण अधिकारी सुनील खमीतकर यांनी अजयसिंह पवार यांच्यासोबत एकत्रित काम केल्याचे अनुभव शेअर केले.

कार्यकारी अभियंता खराडे, प्रकल्प संचालक उमेशचंद्र कुलकर्णी यांनीही वित्त व लेखा अधिकारी अजयसिंह पवार यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

SendShareTweetSend
Previous Post

अजित पवार चांगले की वाईट? या प्रश्नावर सुधीर मुनगंटीवार यांनी दिले रेडिओ स्टेशनचे उदाहरण ; पहा नक्की व्हिडिओ

Next Post

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरानी निराधारांना दिला असा आधार ; तहसील कार्यालयात केली हि सोय

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकरानी निराधारांना दिला असा आधार ; तहसील कार्यालयात केली हि सोय

ताज्या बातम्या

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

अय्यो ! सोलापूर विमानतळ येथे नाईट लँडिंगला म्हणे सिद्धेश्वर कारखान्याच्या आणखी एक चिमणीचा अडथळा ; जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत काय चर्चा झाली

26 June 2026
धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

धैर्यशील मोहितेंनी दाखवलेल्या ‘रेकॉर्डिंग गॉगल’ची चर्चा ; तसा गॉगल कोण लावला होता?

19 June 2026
“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

18 June 2026
धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

12 June 2026
सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

सोलापूरचा माणूस नागपुरात बसलाय, काळजी करू नका ; ‘ स्ट्रिक्ट’ कुमार आशीर्वाद यांना सोलापूरकरांचा हॅपी निरोप

9 June 2026
बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

बिनविरोध नाहीच ! विधान परिषद निवडणुकीत अर्ज बाद झालेल्या काँग्रेस उमेदवारांचे भाजपला हे कमेंट

5 June 2026
आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

आनंद चंदनशिवे यांचे केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंशी तासभर गुफ्तगू ; सोलापुरात राजकीय चर्चेला उधाण

3 June 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार सचिन कल्याणशेट्टींनी सूत्र फिरवली अन् सोलापूरात काँग्रेसचा गेम, हे सात उमेदवार रिंगणात

2 June 2026

क्राईम

“हे एक दिवस होणारच होतं” ; प्रचंड लुबाडणूक सुरू होती, बरं झालं पडल्या हातात बेड्या

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या

by प्रशांत कटारे
18 June 2026
0

सोलापूरच्या शिक्षण विभागातील वेतन पथक अधीक्षक अखेर अँटी करप्शनच्या जाळ्यात ; ग्रंथपाल अन् लिपिकला पण बेड्या सोलापूर : भविष्य निर्वाह...

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी घटना

by प्रशांत कटारे
12 June 2026
0

धक्कादायक ! पत्नीसह दोन मुलांना आइस्क्रीम मधून विष दिले ! स्वतः गळफास घेऊन केली आत्महत्या ; सोलापूरच्या बार्शी तालुक्यात दुर्दैवी...

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला

by प्रशांत कटारे
21 May 2026
0

जगन्नाथ बनसोडे यांच्या अंतरिम अटकपूर्व जामीनाच्या अर्जावर आज फैसला जगन्नाथ बनसोडे व इतरांवर भंगार चोरी प्रकरण सदर बाजार पोलीस ठाण्यात...

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी

by प्रशांत कटारे
12 May 2026
0

सोलापुरात दोन कोटीचे ड्रग्स जप्त ; दोघांना चार दिवसांची पोलिस कोठडी सोलापूर शहरात तब्बल एक किलो एम.डी. (मेफेड्रोन) नावाचा अंमली...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    

Our Visitor

1986069
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group