महाराष्ट्र वफ्फ बोर्ड चेअरमन डॉ. वजाहात मिर्झा आज सोलापुरात
सोलापूर : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अल्पसंख्यांक विभागाचे अध्यक्ष तथा वफ्फ बोर्ड चेअरमन डॉ. वजाहात मिर्झा हे आज गुरुवारी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत.
महाराष्ट्र अल्पसंख्याक विभागाच्या वतीने अल्पसंख्यांक समाजातील अडीअडचणी जाणून घेण्याकरिता सोलापुरात डॉ वजाहात मिर्झा यांच्या उपस्थितीत महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा सायंकाळी सात वाजता जिल्हा परिषद जवळ काँग्रेस भवन येथे आयोजित करण्यात आला आहे. आमदार प्रणिती शिंदे या सुद्धा यावेळी उपस्थित राहणार आहेत.
या महामेळावास जास्तीत जास्त समाज बांधवांनी उपस्थित रहावे असे आवाहन काँग्रेस अल्पसंख्यांक सोलापूर युवक अध्यक्ष नजीब शेख यांनी केले.