राष्ट्रवादीचे किसन जाधव भेटलो सावंत सरांना ; शिवाजी सावंत है तो सब मुमकिन है !
सोलापूर : राष्ट्रवादी काँग्रेस उपमुख्यमंत्री अजित पवार गटाच्या सोलापूरचे माजी गटनेते किसन जाधव यांची जिल्हा नियोजन समितीच्या विशेष निमंत्रित सदस्य पदी निवड करण्यात आली आहे. किसन जाधव यांच्या या निवडीबद्दल सोलापूर शहर जिल्ह्यातून त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे.
मंगळवारी किसन जाधव यांनी शासकीय विश्रामगृहावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना गटाचे जिल्हा संपर्कप्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत यांची भेट घेतली व त्यांचा सत्कार केला. यावेळी जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, उपजिल्हाप्रमुख हरिभाऊ चौगुले उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्या तीन फेब्रुवारी रोजी सोलापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्हा व शहर नूतन कार्यालयाचे उद्घाटन होणार आहे. त्याच अनुषंगाने किसन जाधव यांनी आपल्या भागातील हजारो महिलांसाठी सर्व रोग निदान शिबिर आयोजित केले आहे. त्या शिबिरात सहभागी महिलांना या निमित्ताने साडी वाटपाचा कार्यक्रम त्यांनी घेतला आहे. त्या कार्यक्रमाला स्वतः अजित पवार उपस्थित राहणार असल्याचे समजले.
यावेळी जाधव यांनी सावंत सरांना आरोग्य शिबिरा बाबत माहिती दिली आणि सहकार्य करण्याची विनंती केली आपल्या महायुतीतील घटक पक्षाचे कार्यकर्ते किसन जाधव असल्याने त्यांनी तातडीने जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी यांना स्वतः बोलून या आरोग्य शिबिराचे उत्कृष्ट असे नियोजन करण्याच्या सूचना केल्या. स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार येणार असल्याने या तिन्ही अधिकाऱ्यांनी जातीने लक्ष घालावे असेही त्यांनी सांगितले. सावंत यांच्यामुळे आरोग्य शिबिराचे योग्य असे आणि तातडीने नियोजन झाल्याने जाधव यांनी हात जोडून त्यांचे आभार व्यक्त केले.