सोलापुरात आडम मास्तर यांच्या कार्यालयात एकाची आत्महत्या ; मास्तरांकडून आले हे स्पष्टीकरण
आल्लाउद्दिन बाबुलाल शेख वय वर्ष 80 ही व्यक्ती आज सकाळी साडे अकरा च्या सुमारास दत्त नगर लाल बावटा कार्यालयात गळफास घेतल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
गांधी नगर परिसरातील त्यावेळचे कार्यकर्ते प्रभाकर तेलंग, बाबू कोकणे लिंगव्वा सोलापूरे आणि अल्लाउद्दीन शेख हे 1979 च्या सुमारास गांधी नगर झोपडपट्टी क्रमांक 6 हे बेकायदेशीर असून सोलापूर महानगर पालिका तर्फे उध्वस्त करण्यासाठी आले असता तेथील नागरिक तात्काळ तत्कालीन आमदार कॉ.आडम मास्तर यांच्याकडे धाव घेतली तेव्हा आडम मास्तर तात्काळ त्याठिकाणी पोहोचले व झोपडपट्टीला शासनाकडून संरक्षण मिळवून दिले. तेव्हा पासून तो परीसर मास्तरांच्या प्रभावात होता.त्यामुळे सतत अनेक जनतेचे सामाजिक व न्याय हक्काच्या प्रश्नांवर लढा देताना त्यात या भागातील श्रमिक वर्ग सहभागी होत असत. याच दरम्यान 1985 साली माकप कडून अल्लाउद्दीन शेख यांना सोलापूर महानगर पालिकेची उमेदवारी देण्यात आली.
काही काळानंतर ते पक्षाचे सदस्यत्व नुतनीकरण न केल्याने त्यांचे सभासदत्व रद्द करण्यात आले. तदनंतर अन्य पक्षाकडे ते गेले माकप शी कोणतेच संबंध पुढे ते ठेवले नाहीत. जनता दल, काँग्रेस अशा अन्य पक्षात गेले. परंतु आधी मधी मास्तर यांच्यावर वैयक्तिक प्रेम असल्याने भेटत होते. लोकांचे प्रश्न मांडत होते. कॉ. आडम मास्तर सुध्दा शक्य तितके प्रश्न मार्गी लावत असत.
आज सकाळी सुध्दा शेख नेहमी प्रमाणे मास्तरांना सहज भेटले त्यानंतर कॉ.आडम मास्तर यांचे नातेवाईकांचे निधन झाल्याने ते कार्यालयातून निघून गेले. कार्यालयात नेहमीच लोकांची वर्दळ सुरू असते व कार्यकर्ते ही आपापल्या कामात व्यस्त असतात.तेवढ्यात दर्शनी भागावर असलेल्या एका खोलीत एक कार्यकर्ता काही कामानिमित्त खोलीचा दरवाजा उघडताच अल्लाउद्दीन शेख हे गळफास घेतल्याचे निदर्शनास आले तेव्हा तात्काळ जेलरोड पोलीस ठाणे यांना खबरबात देण्यात आली.सिव्हील हॉस्पिटलकडून तातडीने अंबुल्स येऊन मृतदेह ताब्यात घेतले. पुढील तपास जेलरोड पोलीस ठाणे मार्फत सुरू आहे. यावेळी कॉ.युसुफ मेजर यांनी सिव्हील हॉस्पिटलमध्ये मयताच्या कुटुंबीयांची भेट घेतली.