राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष दिपकआबांच्या जोडीला 11 उपाध्यक्ष, 6 सरचिटणीस ; 11 तालुकाध्यक्ष ही निवडले ; कुणाला मिळाली संधी
सोलापूर : उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस सोलापूर जिल्ह्याची कार्यकारिणी जिल्हाध्यक्ष दिपक साळुंखे पाटील यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत जाहीर केली. या कार्यकारिणी मध्ये आबांच्या सोबतीला 1 खजिनदार, प्रवक्ता, 11 उपाध्यक्ष, 6 सरचिटणीस, 22 कार्यकारिणी सदस्य, 12 प्रांतिक सदस्य, 11 तालुकाध्यक्ष, 11 तालुका अध्यक्ष व तालुका कार्याध्यक्ष, 11 शहराध्यक्ष, कार्याध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष अशी भरगच्च कार्यकारिणीचा समावेश आहे.
यापूर्वीचा सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदाचा अनुभव पाहता जुन्या आणि नव्यांची सांगड घालून हे कार्यकारिणी तयार करण्यात आले आहे आगामी निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस एक नंबर वर राहील असा विश्वास साळुंखे पाटील यांनी व्यक्त केला.
येणाऱ्या फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे सोलापूर दौऱ्यावर येणार असून त्यांच्या उपस्थितीत पक्षाच्या जिल्हा कार्यालयाचे उद्घाटन तसेच कार्यकर्त्यांचा मेळावा होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
जिल्हा अध्यक्ष दीपक साळुंखे पाटील यांची कार्यकारणी पुढीलप्रमाणे…