“मैं मेरी शिवसेना को काँग्रेस नहीं होने दूंगा ” ; मनिष काळजेंच्या सोलापुरातील या पोस्टरने वेधले लक्ष
सोलापूर : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त सर्वत्र अभिवादन करण्यात येत आहे. जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत. शिवसेनेच्या दोन्ही गटाकडून अभिवादनाचे फलक लावण्यात आले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे भाजप सोबत आहेत, तर उध्दव ठाकरे यांची शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादीच्या युतीमध्ये आहे.
सोलापुरात शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांनी लावलेले अभिवादनाचे पोस्टर सध्या संपूर्ण शहराचे लक्ष वेधून घेत आहे. त्याला कारण ही तसेच असून हे डिजिटल फलक सात रस्ता परिसरातील काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या घराच्या जवळ लावण्यात आले आहे. त्यावर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे शब्द लिहिलेले आहेत.
ते शब्द म्हणजे,”मैं मेरी शिवसेना को काँग्रेस नहीं होने दूंगा ” और मुझे मालुम हुवा हो रही है, तो मैं मेरी दुकान बंद कर दुंगा”. या शब्दांमुळे हे डिजिटल फलक लक्ष केंद्रित करीत आहे. शिवसेनेचे सोलापूर संपर्क प्रमुख शिवाजी सावंत यांच्या सह मनीष काळजे हे सुध्दा शहर मध्य या मतदारसंघातून विधानसभेसाठी इच्छुक आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून कोट्यवधीचा निधी मध्य या मतदारसंघात खर्च केला आहे.