Friday, October 16, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात लाखों नयनांनी अनुभवला अक्षता सोहळा ; शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांचा झाला जयघोष

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
14 January 2024
in धार्मिक
0
सोलापुरात लाखों नयनांनी अनुभवला अक्षता सोहळा ; शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांचा झाला जयघोष
0
SHARES
724
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर –  ग्रामदैवत शिवयोगी सिद्धेश्वर महाराज मंदिर परिसरातील संमती कट्ट्याजवळ ९०० वर्षांची परंपरा असलेला नंदीध्वजांचा अनुपम अक्षता सोहळा रविवारी दुपारी लक्षावधी भाविकांनी अनुभवला. ओम सिद्धरामा नम:… दिड्ड्यम् दिड्ड्यम्… सत्यम् सत्यम्… नित्यम् नित्यम् या मंत्रोच्चारासह मंगलाष्टक सुरू झाले अन् लाखो भाविकांनी सिद्धेश्वरांच्या नंदीध्वजांवर तांदळाच्या अक्षतांचा वर्षाव केला. अपूर्व उत्साह आणि शिस्तीचे दर्शन घडवणाऱ्या या सोहळ्यास दुपारी २.०५ वाजता सुरुवात झाली. एकदा भक्तलिंग बोला… हर्र… बोला हर्र..चा गजर आणि सिद्धेश्वर महाराज की जय असा जयघोष होत होता. अक्षता सोहळ्याला यंदाही लाखों भक्तांची मांदियाळी होती.

शिवयोगी सिद्धेश्वर महाराजांच्या योगदंडाचे प्रतीक असलेल्या सातही मानाच्या काठ्या (नंदीध्वज) संमती कट्ट्याजवळ दुपारी सव्वा एक वाजता दाखल झाल्या. पंचाचार्यांचा समता ध्वज, पालखी होती. नाशिक ढोल या मिरवणुकीत होता. सात काठ्या विविधरंगी फुलांनी सजवल्या होत्या. मानाच्या पहिल्या काठीला सुंदर बाशिंग बांधलेले होते. सवाद्य मिरवणुकीत मोठ्या उत्साहात मंदिर परिसरातील संमती कट्ट्यालगत सात काठ्या आल्या. पांढरे बाराबंदी, धोतर, डोईवर पांढरा फेटा, कपाळाला गंध अशा पेहरावात लाखाे भाविकांमुळे सोहळ्यात उत्साह, भक्ती आणि शिस्तीचे दर्शन घडले.

सुहास शेटे यांनी एक वाजून 35 मिनिटांनी संमती वाचनाला प्रारंभ केला. दिड्ड्यम् दिड्यम्, सत्यम् सत्यम् मंत्रोच्चारात पाच अक्षता टाकण्यात आल्या. सव्वादोन वाजता अक्षता सोहळा पूर्ण झाला. उपस्थित भाविकांनी भक्तिभावाने सिद्धरामेश्वरांचा जयजयकार केला. यानंतर दर्शनाकरता रांगा लागल्या. भाविकांनी एकमेकांना मकर संक्रातच्या शुभेच्छा दिल्या. वेदमूर्ती बसवराज शास्त्री यांनी कन्नड, इंग्रजी, मराठी अशा विविध भाषेतून सिद्धरामेश्वरांचा जयजयकार करत सूत्रसंचालन केले.

मान्यवरांची उपस्थिती

यंदायात्रेसाठी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, महापालिका आयुक्त शीतल तेली, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे हे आपली कन्या स्मृती यांच्यासह उपस्थित होते. बारामती वरून उपस्थित राहिलेले आमदार रोहित पवार यांच्यासोबत सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी माजी महापौर महेश कोठे उपस्थित होते. याच गॅलरीत अक्कलकोटचे मालोजीराजे उपस्थित होते. माजी आमदार दिलीप माने, संपर्कप्रमुख शिवाजी सावंत, अमोल शिंदे, आनंद चंदनशिवे, सोमनाथ केंगनाळकर यांची उपस्थिती होती.

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, आमदार सुभाष देशमुख, आमदार सचिन कल्याणशेट्टी, खासदार जयसिद्धेश्वर महास्वामी, माजी पालकमंत्री आमदार  विजयकुमार देशमुख, माजी आमदार रविकांत पाटील, काँग्रेस नेते सुरेश हसापुरे, हरीश पाटील, माजी आमदार शिवशरण पाटील, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, मनोहर सपाटे, सुदीप चाकोते सर्वसामान्यांप्रमाणे संमती कट्याजवळ होते.

Tags: Akshata sohlaSolapur sidheshwar
SendShareTweetSend
Previous Post

सोलापुरात शिवसेनेच्या आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद ; स्वतः शिवाजी सावंत ठाण मांडून

Next Post

पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अमर साबळे, लक्ष्मण ढोबळे बाराबंदी वेशात ; पालकमंत्री व प्रशासनाला बसण्यासाठी विशेष व्यवस्था

प्रशांत कटारे

ताज्या बातम्या

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

4 October 2026
महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

महालिकेच्या आऊटसोर्सिंग एजन्सींना काळ्या यादीत टाका ; नगरसेवक अक्षय अंजिखाने, ज्ञानेश्वर म्याकल आक्रमक

2 October 2026
गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

15 September 2026
सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

सोलापुरात युवक काँग्रेसने उडवली कागदी विमाने ; भाजपची उडवली खिल्ली

9 September 2026
‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

‘अध्यक्ष वैद्यां’चा झेडपी प्रशासन प्रमुखाला ‘जालीम डोस’ ; अन् नंतर समन्वयाचे दोन घास

8 September 2026
सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

7 September 2026
युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

5 September 2026
धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

धक्कादायक : राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्यांक जिल्हा कार्याध्यक्ष रियाज शेख यांचे निधन

29 August 2026

क्राईम

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू

by प्रशांत कटारे
4 October 2026
0

ब्रेकींग! रंगभवन चौकात भीषण अपघात; बसखाली आल्याने सायकलस्वाराचा मृत्यू सोलापूर : शहरातील रंगभवन चौकात आज, ४ ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री...

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या ‘नेता ‘ विरुद्ध गुन्हा दाखल

by प्रशांत कटारे
15 September 2026
0

गणेशोत्सव वर्गणी करिता मागितले तीन लाख आणि मारण्याची धमकी ; त्या 'नेता ' विरुद्ध गुन्हा दाखल सोलापूर : गणेशोत्सव मंडळाच्या...

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त

by प्रशांत कटारे
7 September 2026
0

सोलापुरात सुखसागर डान्स बार वर छापा ; 15 महिला व ग्राहक ताब्यात, 28 लाखाचा मुद्देमाल जप्त सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात अवैध...

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या !

by प्रशांत कटारे
5 September 2026
0

युट्युबवर व्हिडिओ पाहिला अन् कुलुपात पेट्रोल ओतून कुलूप फोडले ; घरपोडीतील चोरट्याच्या ग्रामीण पोलिसांनी मुसक्या आवळल्या ! सोलापूर : दिनांक...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

October 2026
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Sep    

Our Visitor

2002515
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group