Tuesday, June 17, 2025
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील टंचाई परिस्थिती ; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या प्रशासनाला तातडीने सूचना

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
9 January 2024
in Administration
0
मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील टंचाई परिस्थिती ; जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या प्रशासनाला तातडीने सूचना
0
SHARES
318
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, दिनांक 9(जिमाका):- टंचाई सदृश परिस्थितीच्या अनुषंगाने मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील प्रशासकीय यंत्रणेने प्रत्येक गावातील पाणी व चारा टंचाईचा सूक्ष्म आराखडा तात्काळ तयार करावा. टंचाईच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रत्येक शासकीय यंत्रणेने अत्यंत जबाबदारीपूर्वक काम करून टंचाई प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील टंचाईच्या परिस्थितीची माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, मंगळवेढा उपविभागीय अधिकारी अमित माळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दत्तात्रय गावसाने, जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुधन अधिकारी डॉ. नवनाथ नरळे, जिल्हा जलसंधारण अधिकारी दयासागर दामा, मंगळवेढा तहसीलदार मदन जाधव, सांगोला तहसीलदार संतोष कणसे यांच्यासह संबंधित तालुका कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी, पशुधन विकास अधिकारी व अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की माहे फेब्रुवारी ते माहे जून 2024 अखेरपर्यंतचा टंचाई आराखडा महिना निहाय तयार करत असताना गावनिहाय आवश्यक टँकरची संख्या, गावनिहाय पशुधन संख्या व त्यांना आवश्यक असलेला चारा उपलब्धता याविषयी सूक्ष्म नियोजन तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तालुका पशुधन अधिकारी यांनी परस्परात योग्य समन्वय ठेवून करावी. तसेच उप विभागीय अधिकारी यांनी या अनुषंगाने तालुकास्तरावर स्वतंत्र बैठका घ्याव्यात व पुढील पंधरा दिवसात दोन्ही तालुक्यांचा टंचाईचा सूक्ष्म आराखडा गावनिहाय सादर करावा. या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सर्व संबंधित यंत्रणांनी अत्यंत काटेकोरपणे नियोजन करून टंचाई प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून नागरिकांना पाणी, काम व जनावरांना चारा उपलब्ध करावा, असे निर्देश त्यांनी दिले.

प्रत्येक तालुकास्तरीय यंत्रणांनी पाणी स्त्रोताची माहिती घ्यावी, टँकर फीडिंग चे पॉईंट सर्च करून ठेवावेत. जनावरांची संख्या गावनिहाय लक्षात घेऊन चारा कधीपर्यंत पुरेल याचे नियोजन करावे. तसेच गावनिहाय सिंचन सुविधा उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांची यादी तयार करून तात्काळ सादर करावी. अशा शेतकऱ्यांना पशुसंवर्धन विभागाकडून त्वरित चारा बियाणे उपलब्ध करण्यात येणार आहे. चारा बियाणे खरेदीसाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून 1 कोटी 92 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आलेला असून पशुसंवर्धन विभागाने आणखी 2 कोटीचा प्रस्ताव त्वरित सादर करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिल्या.
यापूर्वी टंचाई परिस्थिती निर्माण झालेली असताना मंगळवेढा व सांगोला तालुक्यात ज्या पद्धतीने उपायोजना करण्यात आल्या होत्या त्याचा व्यवस्थित अभ्यास करून माहे फेब्रुवारी 2024 पासून महिना निहाय पाणी व चाऱ्याचे सूक्ष्म नियोजन करावे.

 

मागील वेळी कोणत्या गावांमध्ये महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून कामांची मागणी आलेली होती त्याची माहिती घेऊन त्या गावातील सध्याची परिस्थिती व सेल्फ वरील कामांची उपलब्धता ठेवावी, अशा सूचना अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिल्या. तर महसूल उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी मंगळवेढा व सांगोला तालुका प्रशासनाने टंचाईच्या पार्श्वभूमीवर दिलेली माहिती बैठकीत सादर केली.

मंगळवेढा व सांगोला तालुक्यातील टंचाई परिस्थितीच्या अनुषंगाने प्रत्येक गावाचा गावनिहाय पाणी व चारा उपलब्धता आराखडा तयार करून विहित मुदतीत सादर करण्यात येईल अशी माहिती उपविभागीय अधिकारी अमित माळी यांनी दिली. तसेच सद्यस्थिती टंचाई च्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले. उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत इशाधीन शेळकंदे यांनी महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत दोन्ही तालुक्यात 912 कामे सेल्फवर असल्याची माहिती दिली. सांगोला तालुक्यात 15 मे 2024 पर्यंत चारा कमी पडणार नाही तर मंगळवेढा तालुक्यात पुढील 61 दिवस चारा कमी पडणार नाही अशी माहिती संबंधित तालुका पशुधन अधिकारी यांनी दिली.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पाणी व चारा टंचाई बरोबरच दुष्काळी परिस्थितीत देण्यात येणाऱ्या सवलतीची अंमलबजावणी, रोहयो अंतर्गत रोजगाराचे केलेले नियोजन, जलयुक्त शिवार अभियान, पी एम किसान योजना व अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची भरपाई च्या अनुषंगाने सविस्तर आढावा घेऊन संबंधितांना मार्गदर्शक सूचना दिल्या.

जलयुक्त शिवार अभियान पहिल्या टप्प्यातील मंगळवेढा तालुक्यातील दुरुस्तीचे 25 कामे व सांगोला तालुक्यातील दुरुस्तीची 21 कामांचे कार्यारंभ आदेश जानेवारी आखेर पर्यंत झाले पाहिजेत तर उर्वरित कामांची तपासणी त्वरित करून त्याचा अहवाल सादर करावा असे निर्देश त्यांनी दिले.
**

Tags: Collector kumar ashirwadMangalwedhaSangolaSolapur dushkal
SendShareTweetSend
Previous Post

“आयएएस झाले नसते तर राजकारणी झाले असते” ; पत्रकारांच्या सत्कार समारंभात सीईओ मनिषा आव्हाळे असे का म्हणाल्या

Next Post

सोलापुरात महायुतीने बांधली वज्रमूठ ! ठरले, या दिवशी करणार शक्तीप्रदर्शन

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post
सोलापुरात महायुतीने बांधली वज्रमूठ ! ठरले, या दिवशी करणार शक्तीप्रदर्शन

सोलापुरात महायुतीने बांधली वज्रमूठ ! ठरले, या दिवशी करणार शक्तीप्रदर्शन

ताज्या बातम्या

शरद पवारांचे कौतुक करणारे काका आज साहेबांविरोधात बोलू लागले ! काकांनी मोहिते पाटलांचे ऋण विसरू नये; यांनी घेतले फैलावर

शरद पवारांचे कौतुक करणारे काका आज साहेबांविरोधात बोलू लागले ! काकांनी मोहिते पाटलांचे ऋण विसरू नये; यांनी घेतले फैलावर

17 June 2025
उमेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोलापुरात मिळाला आक्रमक नेता

उमेश पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ; अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सोलापुरात मिळाला आक्रमक नेता

17 June 2025
‘रिस्पेक्टफुल’ जयकुमार गोरे ; शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्षांना दिला असा सन्मान

‘रिस्पेक्टफुल’ जयकुमार गोरे ; शहराध्यक्ष व जिल्हाध्यक्षांना दिला असा सन्मान

17 June 2025
सिद्धेश्वर कन्या प्रशालेत प्रवेशोत्सव साजरा ; विद्यार्थ्यांचे झाले जंगी स्वागत

सिद्धेश्वर कन्या प्रशालेत प्रवेशोत्सव साजरा ; विद्यार्थ्यांचे झाले जंगी स्वागत

16 June 2025
IAS अधिकाऱ्याच्या हातून गुलाब घेताच विद्यार्थ्यांचा आनंद गगनात ! असा झाला प्रवेशोत्सव

IAS अधिकाऱ्याच्या हातून गुलाब घेताच विद्यार्थ्यांचा आनंद गगनात ! असा झाला प्रवेशोत्सव

16 June 2025
अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीस रात्री बारापर्यंत परवानगी द्या ; पालकमंत्र्यांना समाजाचे पत्र

अण्णाभाऊ साठे जयंती मिरवणुकीस रात्री बारापर्यंत परवानगी द्या ; पालकमंत्र्यांना समाजाचे पत्र

16 June 2025
सोलापुरात मालकांच्या कार्यकर्त्यांना रोहिणीताई पचेना ! उत्तर मध्ये भाजपचे अजूनही नरेंद्रचं अध्यक्ष

सोलापुरात मालकांच्या कार्यकर्त्यांना रोहिणीताई पचेना ! उत्तर मध्ये भाजपचे अजूनही नरेंद्रचं अध्यक्ष

16 June 2025
सोलापुरात शरद पवारांना बसणार जोरदार धक्का? हा जिवाभावाचा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत

सोलापुरात शरद पवारांना बसणार जोरदार धक्का? हा जिवाभावाचा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत

15 June 2025

क्राईम

‘सोलापुरात एन्काऊंटर ‘ ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार

‘सोलापुरात एन्काऊंटर ‘ ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार

by प्रशांत कटारे
15 June 2025
0

'सोलापुरात एन्काऊंटर ' ! पुण्याचा गुंड शाहरुख पोलिसांच्या गोळीबारात ठार सोलापूर: पुणे पोलिसाच्या गुन्हे शाखेने केलेल्या गोळीबारात एका कुख्यात गुन्हेगारास...

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा

by प्रशांत कटारे
14 June 2025
0

सोलापुरातील मोठ्या संस्थेत सोळा वर्षानंतर फसवणुकीचा प्रकार उघड ; दोन नामवंतांवर गुन्हा सोलापूर : संस्थेचे सचिव आणि आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्यांनी...

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात

by प्रशांत कटारे
11 June 2025
0

ब्रेकिंग : तीन हजाराची लाच घेणारा तलाठी अँटी करप्शनच्या जाळ्यात अक्कलकोट : खरेदी दस्तावरून सातबाराला नोंद घेण्यासाठी पाच हजाराची लाच...

राष्ट्रवादीच्या ओंकार हजारेचा मृत्यू ; मृतदेह बंद कारमध्ये आढळला

राष्ट्रवादीच्या ओंकार हजारेचा मृत्यू ; मृतदेह बंद कारमध्ये आढळला

by प्रशांत कटारे
9 June 2025
0

राष्ट्रवादीच्या ओंकार हजारेचा मृत्यू ; मृतदेह बंद कारमध्ये आढळला राष्ट्रवादी काँग्रेसचा अजित पवार गटाचा सरचिटणीस ओंकार महादेव हजारे वय-३२ रा....

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

June 2025
M T W T F S S
 1
2345678
9101112131415
16171819202122
23242526272829
30  
« May    

Our Visitor

1766963
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group