आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापुरातील महायुतीच्या नेत्यांनी आपली वज्रमूठ बांधली असून या महायुतीचे समन्वयक तथा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या नेतृत्वाखाली हॉटेल साईप्रसाद या ठिकाणी पहिलीच बैठक घेण्यात आली.
या बैठकीस खासदार डॉ जयसिदधेश्वर महास्वामी, आमदार यशवंत माने, भाजप शहराध्यक्ष नरेंद्र काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे शहर-जिल्हाध्यक्ष संतोष पवार, कार्याध्यक्ष जुबेर बागवान, भाजपचे प्रदेश कार्यकारीणीचे शहाजी पवार, शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे महेश साठे, कल्याणराव काळे, धैर्यशील मोहीते -पाटील, विक्रम देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख मनिष काळजे, दिलिप कोल्हे ,माजी गटनेते किसन जाधव, मनोज शेजवाळ, राजेंद्र हजारे, जमिर शेख, अजित कुलकर्णी, महेश निकंबे, आनंद मुस्तारे, प्रमोद भोसले, वैभव गंगणे, कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे, RPI गटाचे सुशिल सरवदे, अतुल नागटिळक, शिवम सोनकांबळे, रुषी घोलप,
यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट, भाजपा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची शिवसेना शिवसेना, रयत क्रांती सदाभाऊ खोत गट, RPI आठवले गट, प्रहार, शिवसंग्राम या सर्वच प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या बैठकीत येणाऱ्या निवडणुकांच्या अनुषंगाने येत्या १४ जानेवारीला दुपारी ३ वाजता सोलापूरात जामगुंडी मंगल कार्यालय या ठिकाणी महायुतीचा मेळावा आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला. महायुतीचे शक्तीप्रदर्शन या मेळाव्यात पहावयास मिळणार आहे.
मागील हेवेदावे, मतभेद बाजूला सारुन आपण सर्वांनी एकसंघाने मिळून काम करु व विरोधकांना आपली ताकद या माध्यमातून दाखवून देऊ अशा प्रतिक्रिया या बैठकीत व्यक्त करण्यात आल्या.