सोलापूर : शहरातील मडडी वस्ती चौक जोशी गल्लीत गांजा बाळगून विक्री करताना तरुणाला पोलिसांनी अटक केली. ईश्वर संगमेश्वर सरवदे वय 30 राहणार जोशी गल्ली सोलापूर असे त्या अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या जवळ 791 ग्रॅम गांजा मिळून आला.
शुक्रवार 2 जून रोजी दुपारी सव्वा एकच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. त्याला NDPS कायद्यातील तरतुदीनुसार रितसर पंचनाम्यान्वये ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलीस ठाणे गु. र. क्र. 288/2023 कलम 8 (क), 20 (ब), 29 NDPS अधिनियमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ताब्यात घेतलेले तरुणास वैद्यकीय तपासणी करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी जोडभावी पेठ पोलीस ठाणेकडे ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई सपोनि जीवन निरगुडे, पोहकॉ वाजीद पटेल, पोना योगेश बर्डे, मपोना निलोफर तांबोळी, 3 पोना बापू साठे, पोकॉ संजय साळुंखे, म.पो.कॉ. सोनवणे, चालक पो.कॉ.नेताजी गुंड यांनी पार पाडली.



















