Tuesday, August 25, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

सोलापुरात विनापरवाना डिजिटल बॅनर लावाल तर होणार कारवाई ; महापालिका आयुक्तांनी केले दर निश्चित

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
14 June 2023
in solapur
0
0
SHARES
10
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 





सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या  हद्दीत कोणतेही डिजिटल बॅनर होर्डिंग व जाहिरात लावण्यासाठी निश्चित केलेली फी रक्कम भरून महापालिकेच्या भूमी मालमत्ता व संबंधित विभागीय कार्यालयाची रीतसर परवानगी घेणे आवश्यक आहे. अन्यथा दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई करण्यात येईल. सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण टाळण्यासाठी याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी काढले आहेत.


सध्या सोलापुर शहरातील विविध चौकात सण, उत्सव व वाढदिवसाचे बॅनर लावण्यात येत आहेत. सदरचे बॅनर हे विनापरवाना असुन त्यामुळे वाहतुकीस अडथळा व सार्वजनिक मालमत्तेचे विद्रुपीकरण होत आहे. त्या अनुषंगाने महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी अनाधिकृत बॅनर,होडिंग, जाहिरात यावर आळा घालण्यासाठी आदेश जारी केले आहेत. शहरात बॅनर, होडिंग, जाहिरात करण्याकरिता दर निश्चित केले आहेत. यासाठी महापालिका भुमी व मालमत्ता कार्यालय व संबंधित विभागीय कार्यालय यांचेकडुन निश्चित केलेली रक्कम भरून परवानगी घेणे आवश्यक आहे. नागरिकांनी विहित नमुन्यातील अर्ज, वाहतुक शाखेचा ना हरकत दाखला घेऊन संबंधित कार्यालयाकडे परवानगी करिता अर्ज करावेत. एक महिन्यापर्यंत विभागीय कार्यालयाकडुन परवानगी देण्यात येईल. तसेच एक महिना ते एक वर्षासाठी परवानगी पाहिजे असल्यास भुमी व मालमत्ता विभागाकडे अर्ज करावे.


भुमी व मालमत्ता विभागाकडुन देण्यात येणारे परवानगी खालीलप्रमाणे

इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले व फिरते जाहिरात इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले – र.रु. १००/- प्रति चौ. फुट / प्रति दिन


संबंधित विभागीय कार्यालयाकडुन देण्यात येणारे परवानगी खालीलप्रमाणे


जाहिरात / निर्देश फलक र.रु. १५०/- प्रति चौ.फुट / प्रति महिना फिरते जाहिरात डिस्प्ले – र.रु. २०/- ते र.रु. २००/- प्रति चौ. फुट / प्रति महिना


किऑस्क (विद्युत पोलवरील जाहिराती) – र.रु.205/- प्रति महिना / प्रति पोल सायकल वरील जाहिरात मोफत


भिंतीपत्रक / भिंतीवर चिटकविलेली जाहिरात परवानगी नाही भिंत / रस्त्यावरील लिखाण परवानगी नाही स्वागत कमान र.रु. ५००/- प्रति दिवस / प्रति कमान


निशाण / बॅनर / होर्डिंग- र.रु.०५/- ते र.रु. ५००/- प्रति चौ. फुट / प्रति दिवस रोड शो रस्त्यावर / चौकात / मोकळ्या जागेत र.रु. २०००/- ते र.रु. ५०००/- प्रति दिवस


वाहनावर लाऊड स्पीकर लावुन जाहिरात करणे र.रु. १०००/- प्रति वाहन / प्रति दिवस


परवानगी न घेता फलक लावल्यास पाचपट दंड व गुन्हा


परवानगी न घेता बॅनर, होर्डिंग, जाहिरात लावल्यास जाहिरात रकमेच्या पाच पट दंड आकारण्यात येईल व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल. बॅनर,होर्डिंग, जाहिरात च्या दर्शनी भागावर महापालिकेकडुन घेतलेली परवानगी लावण्यात यावे. अन्यथा कारवाई करण्यात येणार आहे. तसेच 

ज्या दुकानदार, व्यवसायिकांनी आपल्या दुकानाच्या समोर अतिरिक्त पत्रासेड अथवा जागा अतिक्रमित केली असल्यास त्यांनीही 15 जुलै च्या आत तो काढून घ्यावा अन्यथा कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.

 —आयुक्त यांचे आवाहन—-


 प्लेक्स प्रिंटींग प्रेस धारकांनी परवानगी असल्याचे खातरजमा करुन काम हाती घ्यावे व जाहिरातवर परवाना क्रमांक व मुदत तसेच आपले नाव व मोबाईल क्रमांक ठळकपणे नमूद करावा. विना परवाना बॅनर, होर्डिंग,जाहिरात लावल्यास जनहित याचिका (PIL)155 मधील उच्च न्यायालयाच्या सुचनेनुसार जाहिरात मध्ये दिसणा-या फोटो अथवा नाव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल, असे महापालिका आयुक्तांनी आदेशात स्पष्ट केले आहे. शहरातील दुकानदार, उद्योजक इतर व्यापार वर्गानी,वाणिज्यिक आस्थापनांनी त्यांच्या शॉप अॅक्ट लायसन्स मध्ये दिलेल्या नामफलक परवाना व्यतिरिक्त इतर जाहिरात फलक, निर्देश फलक लावल्यास संबंधितानी 15 जुलै पुर्वी शहरातील सर्व नागरिक व व्यापारी वर्गांनी महापालिकेकडुन संबंधित विभागाकडे विहित अर्ज करून  परवानगी घेऊनच बॅनर, होर्डिंग,जाहिरात लावुन महापालिकेची कारवाई टाळावी असे आवाहन महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केली आहे.

SendShareTweetSend
Previous Post

राजकारण : जातीपातीचे की विकासाचे ? सिध्देश्वर कारखान्याच्या चिमणी पाडकाम प्रकरणी सोलापूर विकास मंच काय म्हणतय पहा

Next Post

आता ‘Google Mapping’ने होणार जिल्ह्यातील दलित वस्त्यांचा विकास ; अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांची नवी संकल्पना ; Solapur

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

आता 'Google Mapping'ने होणार जिल्ह्यातील दलित वस्त्यांचा विकास ; अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांची नवी संकल्पना ; Solapur

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996479
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group