सोलापूर – संत गाडगे बाबा ग्रामस्वच्छता अभियान मध्ये सन २०१९-२० अंतर्गत आबासाहेब खेडकर पुरस्कार सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्सातील शिवापूर ग्रामपंचायतीस ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते प्रदान करणेत आला.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या झुंबर सभागृहात आज स्वच्छता दिंडीचा शुभारंभ ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांचे हस्ते करणेत आला. या प्रंसगी विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणेचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख, यशदाचे उप संचालक डाॅ. मल्लिनाथ कलशेट्टी, पुणे जिल्हा परिषदेचे प्रभारी सिईओ चंद्रकांत वाघमारे, प्रकल्प संचालक भंडारी, उपायुक्त राहुल साकोरे, उपायुक्त विजय मुळीक, सोलापूरचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, पुणेचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी टोणपे, यशदाचे समन्वयक शाम पटवारी, सहाय्यक गटविकास अधिकारी एस एच पदमवार, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, संवाद सल्लागार सचिन सोनवणे प्रमुख उपस्थित होते.
या प्रसंगी संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात उत्कृष्ट कामगिरी केले बद्दल मोहोळ तालुक्यातील शिरापूर सोलापूर चे सरपंच विजया जनार्दन ताकमोगे, ग्रामसेविका आम्रपाली भालशंकर, उपसरपंच सौदागर साठे, ग्रामपंचायत सदस्य वृषाली सावंत, लक्ष्मण कोळेकर सागर काळे सदस्य याना सन्मानपत्र व ३० हजार रूपयाचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानामध्ये पुणे विभागामध्ये माळशिरस तालुक्यातील मांडवे ग्रामपंचायत तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली.
यावेळी मांडवे माजी सरपंच धनश्री पालवे, शितल दुधाळ, तानाजी पालवे, हणमंत टेळे, ग्रामसेवक बाळासाहेब भोसले, महादेव गायकवाड, पिंटू पालवे यांचा उत्कृष्ट कामगिरी केले बद्दल विभागीय स्तरावरील तृतीय क्रमांकाचा पुरस्कार देऊन ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांच्या हस्ते सरपंच व ग्रामसेवक यांचा सन्मान करणेत आला.


















