सोलापूर : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांच्यासह मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे यांचा वाढदिवसानिमित्त सोमवारी जिल्हा परिषदेमध्ये जिल्हा परिषदेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, कर्मचारी संघटना, विविध विभागाच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या.
जिल्हा परिषद कर्मचारी युनियनच्या वतीने झेडपीच्या आवारात वाढदिवसानिमित्त सीईओ आव्हाळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. त्यानंतर भरजरी फेटा बांधून त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सीईओ आव्हाळे व कॅफे वाकडे यांनी एकमेकींना शुभेच्छा दिल्या.
कर्मचाऱ्यांकडून होत असलेला सन्मान पाहून सीईओ आव्हाळे या भारावून गेल्याचे पाहायला मिळाले. यावेळी बोलताना त्यांनी कर्मचाऱ्यांचा आदर आणि प्रेम पाहून मी खूपच भारावून जाते, माझ्या हातून चांगले काम व्हावे व सोलापूरच्या विकासात माझे छोटेसे योगदान असावे यासाठी मी पुरेपूर प्रयत्न करत असते असे सांगून त्यांनी आपल्या भावना मांडल्या.