Tuesday, August 25, 2026
Sinhasan News
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन
No Result
View All Result
Sinhasan News
No Result
View All Result

चिमणी पडल्यानंतर धर्मराज काडादी यांच्या भेटीला काँग्रेस राष्ट्रवादीसह भाजपच्या नेत्यांची गर्दी ; उद्या विमानसेवा सुरू करा आम्ही बुकिंग करतो

प्रशांत कटारे by प्रशांत कटारे
16 June 2023
in solapur
0
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची को जनरेशनची व विमानसेवेला अडथळा ठरणारी चिमणी अखेर गुरुवारी दुपारी पाडण्यात आली. पोलिसांनी कारखान्याच्या चारी दिशेला कडेकोट बंदोबस्त ठेवल्याने कोणत्याही राजकीय नेत्याला या प्रकरणात हस्तक्षेप करता आला नाही. 

त्यामुळे शुक्रवारी कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी यांच्या निवासस्थानी सर्वच पक्षातील राजकीय नेत्यांची त्यांना समर्थन देण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. यामध्ये विशेष करून भाजपच्या सुद्धा काही ज्येष्ठ नेत्यांनी काडादी याची भेट घेऊन त्यांचे मनोधैर्य वाढवले.

माजी आमदार दिलीप माने, माजी महापौर महेश कोठे, दक्षिणचे नेते सुरेश हसापूरे काँग्रेस तालुकाध्यक्ष हरीश पाटील,भाजपचे जेष्ठ माजी नगरसेवक सुरेश पाटील, माजी नगरसेवक सुभाष शेजवाळ, काँग्रेस नेते अशोक निम्बर्गी, माजी नगरसेवक विनोद भोसले, शहराध्यक्ष चेतन नरोटे, शहराध्यक्ष हेमा चिंचोळकर, गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे, काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष विजयकुमार हततुरे, माजी नगरसेवक तौफिक हत्तूरे, दत्तू बंदपट्टे,  बसवराज म्हेत्रे, बोरामणी विमानतळ संघर्ष समितीचे राजू चव्हाण, भीमाशंकर टेकाळे, तिरुपती परकीपडला यांच्यासह दक्षिण सोलापूर, उत्तर सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील शेतकरी, मार्केट यार्डातील व्यापारी, सिद्धेश्वर कारखान्याचे संचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रत्येकाने काडादी यांची भेट घेऊन आपले समर्थन दिले. दिलीप माने यांनी तर उद्या विमानसेवा सुरू करा आम्ही बुकिंग करायला तयार आहोत असे सांगून चिमणी पाडल्या प्रकरणी प्रशासनावर नाराज व्यक्त केली.

महेश कोठे यांनी थेट नाव न घेता आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावर तोफ डागली. चिमणी पाडण्यामागे भाजपचाच हात असल्याचा थेट आरोप त्यांनी केला.

गोकुळ शुगर चे चेअरमन दत्ता शिंदे यांनी हा कारखाना पुन्हा कसा उभा राहील यासाठी आम्ही धर्मराज काडादी यांच्या कायम पाठीशी राहू असे आश्वासन दिले.

विजयकुमार हत्तुरे यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे बोलणे काडादी यांच्याशी करून दिले. काँग्रेस पक्ष हा काडादी यांच्या पाठीशी असून आज त्यांनी आज चिमणी पाडली उद्या आपण त्यांना पाडू असे आश्वासन दिल्याचे सांगितले. 

अशोक निम्बर्गी यांनी पोलीस प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. सोलापुरात कुठला आतंकवादी हल्ला होता का? एवढा बंदोबस्त लावला होता. आता चिमणी पाडलात तुमचे अभिनंदन ! परंतु आता कधी विमानसेवा सुरू करणार? किती विमान उडणार? किती लोकांच्या हाताला रोजगार मिळणार? किती उद्योग सोलापुरात आणणार? किती शेतकऱ्यांचा उध्वस्त झालेला संसार उभा करणार? हे सुद्धा आम्हाला पाहिजे आहे.

SendShareTweetSend
Previous Post

दुःखद! कुमठा नाका येथील युवक किर्तीपाल फडतरे याचे निधन ; मित्र परिवारातून शोक व्यक्त

Next Post

धर्मराज काडादी यांना आलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या फोनची सोलापुरात सर्वत्र होतेय चर्चा

प्रशांत कटारे

प्रशांत कटारे

Next Post

धर्मराज काडादी यांना आलेल्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या फोनची सोलापुरात सर्वत्र होतेय चर्चा

ताज्या बातम्या

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

24 August 2026
प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

22 August 2026
‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

‘ईच्छा‎ भगवंताची’‎ परिवाराकडून आ.अनिकेत तटकरे‎ यांचा‎ सोलापुरी पद्धतीने सन्मान

17 August 2026
सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

11 August 2026
सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

सोलापुरात पहिले कॉक्लिअर इम्प्लांट सेंटर सुरू!

10 August 2026
अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

10 August 2026
ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त सोलापूर शहर युवक कॉंग्रेस मशाल रॅली

9 August 2026
निधी समान देईन, दूजाभाव करणार नाही ! उपाध्यक्ष इंद्रजीत पवार यांचा शब्द ; रश्मी दीदींची यशस्वी मध्यस्थी

अय्यो ! आता कस रे बाबा, चार्ज गेला की, तेव्हा झेडपी सदस्यांनी वाचवले होते ; आरोग्यच्या ‘डॅम’ पदमुक्त

4 August 2026

क्राईम

सोलापूर दक्षिणच्या भाजप नेत्याला धक्का ;  महिलेने केला विशाल गायकवाड विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा

by प्रशांत कटारे
24 August 2026
0

सरकारी नोकरी लावतो, माहेरहून पैसे आण ; विवाहितेचा सासरी छळ, विजापूरनाका पोलिसांत गुन्हा सोलापूर : माहेरून दागिने आणि पैसे आणण्याचा...

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही

by प्रशांत कटारे
22 August 2026
0

प्रमोद गायकवाड यांच्या मुलाला तात्पुरता वैद्यकीय जामीन ; पण सोलापुरात येता येणार नाही सोलापुरातील वैभव वाघे खून खटल्याशी संबंधित सदर...

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले!

by प्रशांत कटारे
11 August 2026
0

oplus_2 oplus_2 सोलापुरात चोरट्याने रोख रकमेसह चोरले कॅडबरी अन् फेस वॉश ; पोलीस चौकी शेजारील मेडिकल फोडले! सोलापूर : कुमठा...

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल

by प्रशांत कटारे
10 August 2026
0

अडीच वर्ष कारागृहात असलेले उत्तर प्रदेशचे पती पत्नी निर्दोष; सोलापूर न्यायालयाने दिला निकाल परिस्थितीजन्य पुरावा आधारीत खटला शाबितीसाठी परिस्थितीजन्य पुराव्याची...

Load More

आमच्याबद्दल

सिंहासन  या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क –

pkatare82@gmail.com
  • “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    “बेटा, हा प्रकल्प नितीन गडकरी साहेबांना पाठव” ; दिलीप माने यांनी विद्यार्थिनीला दिली कौतुकाची थाप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • Breaking : सोलापुरात डॉक्टर शिरीष वळसंकर यांनी स्वतःच्या डोक्यात झाडली गोळी? ; प्रकृति गंभीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • धक्कादायक ! जिल्हा परिषदेचे नेते विवेक लिंगराज यांच्यासह तिघांचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0

वृत्त संग्रह

August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

1996493
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश विदेश
  • राजकीय
  • क्राईम
  • आरोग्य
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

Latest-update-WhatsApp-group