सोलापूर : पंढरपूरच्या आषाढी एकादशी निमित्त उजनी धरणातून अडीच टीएमसी पाणी सोडण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून मिळाली.
महाराष्ट्रात पावसाने अद्याप ओढ दिली आहे. तसेच पंढरपूर मध्ये आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते, हे वारकरी चंद्रभागा नदीत स्नान करतात. यंदा वारकऱ्यांची मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे.
सध्या वारकऱ्यांची संख्या कमी असून त्यांच्यासाठी पंढरपूर जवळील गुरसाळे बंधाऱ्यातून पाणी सोडण्यात आले आहे. 21 जून रोजी उजनी धरणातून साडे चार हजार क्युसेक्स वेगाने अडीच टीएमसी पाणी सोडण्यात येणार असून हे पाणी 24 जून रोजी पंढरपुरात पोहोचेल.
अडीच टीएमसी पाणी सोडल्याने सोलापूर शहराला पाणी पुरवठा होणाऱ्या औज बंधाऱ्यात पाणी येणार असल्याने सोलापूर शहराचा पाणीपुरवठयाचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.



















