3 डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सालाबाद प्रमाणे जिल्हा परिषद मुख्यालय, पंचायत समिती उत्तर, दक्षिण सोलापूर मध्ये कार्यरत दिव्यांग कर्मचाऱ्यांचा कार्यालयीन उपयोगी डायरी, पेन जिल्हा कृषी अधिकारी नंदकुमार पाचकुडवे यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी राज्य सरचिटणीस विवेक लिंगराज, महिला अध्यक्ष अनुपमा पडवळे, उपाध्यक्ष सविता काळे, राजश्री कांगरे उपस्थित होते. प्रस्ताविक अध्यक्ष तजमुल मुतवली, सूत्रसंचालन श्रीशैल्य देशमुख तर आभार प्रदर्शन मनोज राठोड यांनी केले.
या कार्यक्रमास दिव्यांग कर्मचारी संघटनेचे जिल्हा सचिव लक्ष्मण वंजारी, आरती माढेकर, जयंत पाटील, प्रज्ञा कुलकर्णी, भिमाशंकर तेली, मुशीर कलादगी, रामकृष्ण पेरला पंकज वेदपाठक, सुधीर फुलारी, वीरभद्र हिरजे, राजू राऊत, हरिष म्हेत्रस संतोष निळ, शैलेश पाठक, प्रताप चव्हाण ,पिराजी सुरवसे, संजय सातपुते, रवींद्र चव्हाण, अमित शहा आदी दिव्यांग कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी विशाल घोगरे, रोहित शिंदे, वर्षा आउदूर्ती , विलास मासलकर,संतोष शिंदे, राकेश सोडी ,डॉ.एस.पी.माने, राजीव गाडेकर,मल्लिकार्जुन स्वामी, मिथुन भिसे ,ओम कोकणे,हरूनपशा नदाफ आदींनी परिश्रम घेतले