सोलापूर : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शहर कार्यालय प्रमुख पदी निष्ठावंत शिवसैनिक विठ्ठल कुऱ्हाडकर यांची निवड करण्यात आली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख अनिल कोकीळ व जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरप्रमुख – विष्णू कारमपुरी यांच्या शिफारशीवरून विठ्ठल चौडप्पा कुऱ्हाडकर यांची शहर कार्यालय प्रमुख पदी निवड करण्यात आली.
विठ्ठल कुऱ्हाडकर हे सुमारे 35 वर्षापासून शिवसैनिक प्रमुखांच्या विचाराने प्रेरित होऊन बाल शिवसैनिक पासून शिवसेनेचे काम करतात. त्यांनी बाल शिवसेना, शाखाप्रमुख, शिवसेना शाखाप्रमुख, उपविभागप्रमुख, विभाग प्रमुख, महाराष्ट्र कामगार सेनेचे – खजिनदार व सेक्रेटरी या पदावर काम केले व करीत आहे. त्याचबरोबर अनेक सामाजिक व सांस्कृतिक मंडळाचे पदाधिकारी सुद्धा आहेत. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. त्याचबरोबर जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे साहेब व शहर प्रमुख विष्णु कारामपुरी व युवती सेनेचे शहरप्रमुख रेखा आडकी यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.



















