सोलापूर – जिल्हा परिषदेने पालखी मार्गांवर महिला वारकरी यांचे साठी दिलेल्या सुविधांबद्दल राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी समाधान व्यक्त केले आहे.
नातेपुते येथे महिला भाविकांसाठी देणेत आलेल्या सुविधांची पाहणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर व आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांनी केली.
या प्रसंगी सोलापूर जिल्हा परिषदेचे प्रशासक व मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा कार्यक्रमाधिकारी जावेद शेख, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डाॅ. विजय खोमणे, गटविकास अधिकारी पंचायत समिती माळशिरसचे विनायक गुळवे, नगरपालिका मुख्याधिकारी माधव खांडेकर, बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी अलडवाड, नातेपुते नगरपंचायतचे नगराध्यक्ष श्रीमती पलंगे, उपनगराध्यक्ष मालोजीराजे, राज्य महिला आयोगाच्या श्रीमती ठाकूर, श्रीमती नेहा आदी प्रमुख उपस्थित होते.
या प्रसंगी सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे संकल्पनेतून सुरू केलेल्या सायकल बॅंकेच्या माध्यमातून चार सायकलींचे वाटप राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांचे हस्ते करणेत आले.
सोलापूर जिल्हा परिषदेने महिलांसाठी खास शौचालय सुविधा व स्नानगृहाची व्यवस्था केली आहे. खाजगी कुटूंबांनी देखील स्वत ची शौचालये महिलांसाठी उपलब्ध करीन दिली आहेत. या शौचालयावर पांढरे झेंडे लावणेत येत आहेत. हिरकणी कक्षा बरोबरच सॅनिटरी नॅपकिन ची सुविघा तयार करून देणेत आली आहे. असेही जिल्हा परिषदेचे सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले. पालखी मार्गांवर महिलांमध्ये सुविधांची जागृती करणे साठी मोबाईल डिजिटल व्हॅन देणेत आली आहे. महिला विषयक विविध योजना व आरोग्याची काळजी घेणे बाबत आवाहन करणेत येत आहेत.
महिला वारकरी यांचे साठी प्रशासनाने केलेले काम कौतुकास्पद- अध्यक्षा रूपाली चाकणकर
……………..
सोलापूर जिल्हा परिषदेने महिला वारकरी यांचे साठी शौचालय सुविधा, हिरकणी कक्ष, सॅनिटरी नॅपकिन सुविधा, आरोग्य तपासणी, वृध्द महिला वारकरी यांचे साठी स्वयंचलित पायाचा मसाज करणारी मशीन उपलब्ध करून दिली आहे. या बाबी कौतुकास्पद आहेत. गतवर्षी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी खुप मेहनत घेतली होती. या वर्षी अधिकारी व कर्मचारी यांना चांगल्या प्रकारे दिशा दिलेमुळे महिलांसाठी चांगलू सोय निर्माण केली असल्याचे राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी व्यक्त केले.
प्रारंभी शिक्षणाधिकारी जावेद शेख यांनी प्रास्तविक करून विविध राबविणेत येणारे उपक्रमांची माहिती दिली. स्वागत बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी अल्लडवाड यांनी केले. गटविकास अधिकारी विनायक गुळवे यांनी आभार मानले.




















